Accident
Accident Sakal Media
नाशिक

सिन्नर : पाण्याच्या टाकीला धडकून दुचाकीस्वार ठार; एक गंभीर जखमी

अजित देसाई

सिन्नर (जि. नाशिक) : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील सांगवी शिवारात वडांगळी-उजणी रस्त्यालगत जमिनीला समांतर असलेल्या पाण्याच्या टाकीला दुचाकी धडकल्याची घटना घडली. आज दि.27 सकाळी साडेसहा वाजेपूर्वी झालेल्या या अपघातात एक युवक घटनास्थळीच मृत्यूमुखी पडला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.

वडांगळी-उजनी रस्त्यालगत सांगवी शिवारात शेतात असलेल्या सिमेंटच्या टाकीला एमएच 15 जिपी 0180 ही पल्सर मोटरसायकल धडकलेल्या अवस्थेत सकाळी रस्त्यावरून जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या निदर्शनास आली. तसेच दुचाकी जवळ दोन अनोळखी युवक पडलेले असल्याचे आढळले. पहाटेच्या वेळी रस्त्याने जात असताना सदर दुचाकीचा हा अपघात झाला असण्याची शक्यता आहे. दोघांपैकी एक युवक जागेवरच मृत्य झाला होता तर दुसरा गंभीर जखमी होऊन बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता.

स्थानिकांनी याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात माहिती देत पांगरी येथील शांताराम वारुळे यांच्या रुग्णवाहिकेला पाचारण केले. दोघा अपघातग्रस्त तरुणांना सिन्नर येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे पोहोचण्यापूर्वीच निलेश सुधाकर आवारे वय 34 राहणार वाकद शिरवाडे तालुका निफाड याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरने सांगितले. तर सुनिल दौलत वाणी वय 38 राहणार चिंचोळे शिवार, अंबड (नाशिक) हा जखमी झाला असल्याने त्यास उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले.

दवाखान्यात आणल्यावर खिशातील ओळख पत्रावरून दोघांची ओळख पटली. यावेळी मोबाईल फोनवर येणाऱ्या कॉलवर दोघांच्याही घरच्यांना अपघाताची माहिती देण्यात आली. मयत निलेश आवारे यांचा मृतदेह सिन्नर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. तेथे शवविच्छेदन केल्यानंतर नातेवाईकांनी तो ताब्यात घेतला. या अपघातप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई सागर गीते याप्रकरणी तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; देशपांडेने दुसऱ्याच षटकात दिले दोन धक्के

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT