crime
crime sakal
नाशिक

Nashik | मालेगावात बंदुकीचा धाक दाखवून दरोडा! सहा जण गजाआड

प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : दीपोत्सव काळात मजा मारण्याच्या हेतूने एखाद्या अनोळखीला फसवून त्याचा गेम करण्याचा प्रयत्न तरुणांच्या अंगलट आला. ‘आली लहर, केला कहर’ या उक्तीप्रमाणे बंदुकीचा धाक दाखवून अपहरण, दरोडा, रस्ता लूट व खंडणीसाठी दमबाजी करणाऱ्या सहा जणांना छावणी पोलिसांनी अटक केली आहे. २८ हजाराचा मोबाईल लुटणाऱ्या तरुणांची दिवाळी मजेत गेली. मात्र, दिवाळीनंतरचा उत्तरार्ध त्यांच्यासाठी पोलिस कोठडीची हवा खाणारा ठरला. त्यातच या तरुणांची चार लाख रुपये किंमतीची गुन्ह्यात वापरलेली इर्टिगा कारही जप्त करण्यात आली. अवघ्या चोवीस तासात पोलिसांनी संशयितांना जेरबंद केले.

याबाबत माहिती अशी की, मित्र असलेल्या पाच ते सहा जणांना कट्ट्यावर गप्पा मारताना एखाद्याला गंडविण्याची हुकी आली. त्यातूनच त्यांच्या डोक्यात चोरीचा व लुटीचा बेत आला. परराज्यातील फर्निचर व्यावसायिक असलेल्या एकाचे व्हिझिटींग कार्ड मिळवून त्याला दरवाजा बनवायचे आहेत. माप घेण्यासाठी ये असे सांगून रिव्हॉलव्हरचा धाक दाखवून त्याच्या ताब्यातील २८ हजार रुपये किंमतीचा सॅमसंगचा मोबाईल लुटण्याचा व पाच लाख रुपये खंडणी मागण्याचा प्रकार गेल्या आठवड्यात झाला. पद्माराम चौधरी (वय २३, रा. दुधवट, ता. राणीवाडा, जि. जालोर, राजस्थान, हल्ली गिरणा स्टिल सोयगाव) या फर्निचर व्यावसायिकाला दरवाजांचे माप घेण्याच्या नावाने बोलावून त्याला इर्टिगामध्ये (एमएच ४१ एएस २९१४) बसवून साईट बघण्याच्या बहाण्याने गाडीत बसवून अपहरण करीत बंदुकीचा धाक दाखवून मोबाईल लुटला. तसेच, पाच लाख रुपयांची खंडणी दे अन्यथा मारुन टाकू अशी दमबाजी केली. २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर हा प्रकार घडला. मोबाईलवरुन संबंधितांनी धमकीही दिली. या प्रकारामुळे भेदरलेल्या चौधरी यांनी रविवारी (ता. ७) छावणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

छावणी पोलिसांनी गुन्हा दाखल होताच अपर पोलिस अधिक्षक चंद्रकांत खांडवी, उपअधिक्षक पुष्कराज सूर्यवंशी, पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील अहिरे, पोलिस नाईक नितीन बारहाते, मोठाभाऊ जाधव, संजय पाटील, कैलास सोनवणे, विजय घोडेस्वार आदींनी या प्रकरणातील संशयितांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध दरोडा, अपहरण, खंडणी व शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चार लाख रुपये किंमतीची इर्टिगा व २८ हजाराचा मोबाईल असा ऐवज जप्त केला आहे.

यांनी केली लुटमार

गोपिचंद शेलार (वय २२), मंगलदास अहिरे (वय २४), कल्पेश देवरे (वय २१), अमोल बच्छाव (वय ३२, चौघे रा. नगाव), भूषण सोनवणे (वय २६, टेहेरे), प्रशांत उर्फ पिंटु जाधव (वय ३२, श्रीरामनगर, गवळीवाडा) यांनी दरोडा टाकला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वाती मालीवाल प्रकरणात CM केजरीवाल अन् त्यांच्या पत्नीची चौकशी होणार, महिला आयोग आक्रमक!

Darjeeling Tea: किंमती वाढल्या पण निर्यात घटली; दार्जिलिंग चहा संकटात का आहे?

JEE Advanced Admit Card 2024 : जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी प्रवेशपत्र आज मिळणार; असे करा डाऊनलोड

Pakistan Espionage Case : पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी फरार मुख्य आरोपीला अटक; NIA ची कर्नाटकात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : धक्कादायक! पुण्यात कोयत्याने सपासप करुन तरुणाचा टोळक्याकडून खून

SCROLL FOR NEXT