corona deaths sakal
नाशिक

नाशिक : सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात सहा कोरोना मृत्‍यू

एक हजार ८६ पॉझिटिव्‍ह, दोन हजार ३८८ कोरोनामुक्‍त

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सक्रिय रुग्‍ण संख्येत जिल्ह्यात सातत्‍याने घट होत आहे. मात्र कोरोना बळींची संख्या चिंता वाढविणारी ठरते आहे. सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यातील मृतांची संख्या सहा राहिली. दिवसभरात एक हजार ८६ रुग्‍णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. तर दोन हजार ३८८ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे. सद्यःस्‍थितीत जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या कमी होऊन बारा हजार १४२ वर पोचली आहे.

बुधवारी झालेल्‍या सहा मृत्‍यूंमध्ये नाशिक महापालिका क्षेत्रातील चार, नाशिक ग्रामीण भागातील दोन मृतांचा समावेश आहे. नव्‍याने आढळलेल्‍या बाधितांमध्ये नाशिक महापालिका क्षेत्रातील ८४२, नाशिक ग्रामीणमधील १९२, मालेगाव महापालिका क्षेत्रातील २८, तर जिल्‍हा बाहेरील २४ रुग्‍णांना कोरोनाची लागण झाल्‍याचे निदान झाले आहे. सायंकाळी उशिरापर्यंत एक हजार ४७६ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. यातील सर्वाधिक एक हजार १९७ प्रलंबित अहवाल नाशिक ग्रामीणमधील आहेत. नाशिक शहरातील १५६, तर मालेगावच्‍या १२३ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती.

जिल्ह्यात ३२ लाख चाचण्या

बुधवारी नाशिक जिल्ह्यात ३२ लाख चाचण्यांचा टप्पा ओलांडला गेला आहे. आत्तापर्यंत ३२ लाख ३ हजार ७३० स्‍वॅब चाचण्या करण्यात आल्‍या आहेत. त्‍यापैकी चार लाख ६९ हजार ३३७ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. २७ लाख ३२ हजार ९१७ रुग्‍णांचे अहवाल निगेटिव्‍ह आले आहेत. चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्‍हीटी दर १४.६५ टक्‍के राहिला आहे. आत्तापर्यंत चार लाख ४८ हजार ३७१ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे. आठ हजार ८२४ बाधितांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TET चा पेपर नेमका कसा फुटला? भिवंडीत काय घडलं? परीक्षा अचानक रद्द; राज्य परीक्षा परिषदेचं पत्र आलं समोर

What is Gautam Adani Startup Initiative? फक्त मोठ्या शहरातच नाही, आता खेड्यापाड्यातील उद्योजकांनाही मिळणार अदानींचा पाठिंबा; काय आहे 'वंदे भारतम्' उपक्रम?

Latest Marathi News Live Update : ऑपरेशन टायगरच्या यशानंतर श्रीकांत शिंदे शनी चरणी होणार नतमस्तक...

आधी NEET अन् आता TET; महाराष्ट्रात पुन्हा पेपरफुटीचं ग्रहण, ठाण्यात पेपर लीक झाल्याने परीक्षा रद्द, लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य पुन्हा टांगणीला

Bank News: 30 जूननंतर जुन्या ₹10, ₹20, ₹50 आणि ₹100 च्या नोटा बंद होणार? बँक ऑफ महाराष्ट्र ने दिले मोठे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT