doctor esakal
नाशिक

सिक्स सिग्मा प्रकरण भोवले; आरोग्य अधिकाऱ्यांचा पदभार काढला

प्रमोद सावंत

मालेगाव (जि.नाशिक) : शहरातील सिक्स सिग्मा (six sigma hospital) व सनराईज या हॉस्पिटलला परवानगी देताना कागदपत्रांची योग्यरीत्या तपासणी केली नाही. त्यातच रुग्णांकडून अवाजवी बिलांची मागणी झाल्यानंतर कृषिमंत्री दादा भुसे (dada bhuse) यांनी अधिकाऱ्यांसह या रुग्णालयाची झाडाझडती घेतल्यानंतरही कारवाईस विलंब करण्याचे प्रकरण महापालिकेच्या आरोग्याधिकारी डॉ. सपना ठाकरे यांना भोवले. आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी डॉ. ठाकरे यांचा पदभार काढून घेतला असून, डॉ. हेमंत गढरी यांच्याकडे प्रभारी पदभार देण्यात आला आहे. (Six-Sigma-hospital-case-Removed-health-officer-marathi-news)

सिक्स सिग्मा प्रकरण भोवले...

सिक्स सिग्मा व सनराईज हॉस्पिटलवरील भुसे यांच्या भेटीला नऊ दिवस उलटूनही कुठलीही कारवाई न झाल्याने आरोग्याधिकाऱ्यांना निलंबित करावे, रुग्णालयांवर कारवाई करावी, या मागणीसाठी बाजार समितीचे उपसभापती सुनील देवरे यांनी शिवसेनेच्या बैठकीत उपोषणाचा इशारा दिला होता. यानंतर तातडीने हालचाली झाल्या. महापालिका अधिकारी, महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या अधिकाऱ्यांनी या रुग्णालयांची तपासणी व चौकशी केली. सायंकाळी डॉ. ठाकरे यांना पदमुक्त करण्यात आले. ठाकरे यांनीही वारंवार या पदाचा राजीनामा देण्याचा इशारा दिला होता.

आरोग्य अधिकाऱ्यांचा पदभार काढला

डॉ. गढरी यांच्याकडे तात्पुरता पदभार देण्यात आला असून, डॉ. ममता लोथे यांची आरोग्याधिकारीपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे. डॉ. लोथे रजेवर असल्याने गढरी यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली. महापालिकेने सिक्स सिग्मा व सनराईज हॉस्पिटलने सादर केलेल्या लेखापरीक्षण अहवालाची चौकशी सुरू असल्याचे मुख्य लेखापरीक्षक राजू खैरनार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते; पहाटे 2.30 वाजता होणार महापूजा

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT