Ganeshotsav 2022 esakal
नाशिक

Ganeshotsav 2022 : गणेशोत्सवात Smart Cityच्या कामांना ब्रेक

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गणेश उत्सवाच्या काळात नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी स्मार्टसिटी कंपनीकडून काही कामांना ब्रेक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातीलच एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे मानवी चौक ते काट्या मारुती चौकापर्यंत स्मार्टसिटी अंतर्गत सुरू असलेले काम गणेशोत्सव पूर्ण होईपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना स्मार्टसिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांनी दिल्या. (Smart City work break during Ganeshotsav 2022 Nashik latest marathi news)

स्मार्टसिटी कंपनीअंतर्गत गावठाण भागात पायाभूत सुविधांची कामे हाती घेण्यात आली आहे. पावसामुळे कामे संथगतीने सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. कामांमुळे अनेक ठिकाणी पाण्याची पाइपलाइन फुटणे यासारख्या तक्रारी वाढत आहेत.

यातून मार्ग काढत असताना आता गणेशोत्सव जवळ आल्याने नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी मोरे यांनी गावठाण भागाचा दौरा करून काही कामे स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने स्मार्टसिटी कंपनीकडून ठेकेदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. यात मानवी चौक ते काट्या मारुती चौक या दरम्यानचे काम गणेशोत्सव होईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

भालेकर मैदानावर सुरक्षारक्षक

सुंदर नारायण मंदिर ते पंचवटी कारंजा या दोन ठिकाणी असलेल्या अडचणी सोडून गणेश मंडळांना कुठलीही अडचण येऊ नये यासंदर्भात दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. मखमलाबाद स्टॅन्ड ते मालेगाव स्टॅन्ड या दरम्यानची कामे २९ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात यावी. तसेच, रामवाडी मुख्य चौफुली येथे काम पूर्ण करून गणेशोत्सव काळात अडचण येऊ नये या संदर्भात कार्यवाही करावी.

लक्ष्मीनारायण मंदिर ते सरदार चौक या दरम्यान मंडळांना मंडप टाकण्यात अडचण येणार नाही, याची दक्षता घ्यावी. गोरेराम लेन येथील रस्ता तात्पुरता रहदारीसाठी खुला करण्याच्या सूचना देण्यात आल्या. भालेकर मैदानावर सुरक्षारक्षक नियुक्त करण्याच्या सूचना श्री. मोरे यांनी दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Guru Purnima Remedies 2025: गुरु पौर्णिमेच्या रात्री करा 'हे' उपाय, माता लक्ष्मी प्रसन्न होतील

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Latest Maharashtra News Updates : ..तर हे स्पष्ट होईल, की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे! - उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT