SmartCity Company Twenty-four hour water supply nashik sakal
नाशिक

नाशिक : चोवीस तास पाणीपुरवठ्याचे नियोजन

अतिरिक्त जलकुंभासह स्वयंचलित वॉटर ऑडिट

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : स्मार्टसिटी कंपनीतर्फे पंचवटी परिसरात स्मार्टसिटीच्या कार्यक्षेत्रात चोवीस तास पाणीपुरवठ्याचे नियोजन सुरू आहे. त्यासाठी चार जलकुंभाचे नियोजन आहे. नागरिकांना पाणी साठवणुकीची गरज पडायला नको, यासाठी स्वयंचलित मीटर रीडिंग प्रयोग केला जाणार आहे. पंचवटीतील गावठाण क्षेत्रात पाणी नियोजनाला सुरवात झाली आहे.

पंचवटीतील कंपनीच्या कार्यक्षेत्रात सुरळीत सुलभ पाणीपुरवठ्याचे नियोजन करताना त्या भागातील नागरिकांना घरात पाणी साठवणुकीची वेळच येऊ नये यासाठी अद्ययावत पाणी वितरण योजनेचे नियोजन केले आहे. त्यानुसार चोवीस तास पाणीपुरवठा केला जाणार आहे. प्रतिमाणसी सरासरी दिडशे लिटर याप्रमाणे पाणी चोवीस तास उपलब्ध राहील. त्यासाठी चार जलकुंभ उभारण्याचे नियोजन केले आहे. साधारण दर दहा वर्षानी होणारी लोकसंख्या वाढ डोळ्यासमोर ठेवून कंपनीने नियोजन सुरू आहे.

साडेसात हजारांवर घरांसाठी मीटर

केंद्र शासनाचा सगळा निधी स्मार्टसिटी कंपनीला यापूर्वीच मिळाला आहे. त्यात पाणीपुरवठा केंद्राचे नियोजनात कंपनीने जलकुंभ, पाणीपुरवठ्यासाठी स्काडा यंत्रणा आणि पाणी मीटरचे रीडिंग घेण्यासाठी जागोजागी टॉवर उभारून अद्ययावत मीटर रीडिंग घेण्याची सोय असलेली स्वयंचलित यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. साधारण साडेसात हजारावर घरांसाठी मीटरचे नियोजन आहे. प्रायोगिक तत्त्वावरील या उपक्रमासाठी पहिल्या टप्प्यात केवळ व्यावसायिक आस्थापनांना होणारा पाणीपुरवठ्याचे वॉटर ऑडिट होणार आहे. त्यानंतर त्याचा प्रतिसाद पाहून घरगुती पाणीयोजनाचा समावेश करायचा की नाही, याचा निर्णय घेतला जाणार आहे.

नव्या नियोजनात चार जलकुंभाचे नियोजन आहे. त्यात दीक्षित वाडा, बारा बंगला, गोल्‍फ क्लब या ठिकाणी हे जलकुंभ उभे राहतील. साधारण ३० महिन्यात हे कामकाज पूर्णत्वास जाईल, असे स्मार्ट सिटी कंपनीचे नियोजन सुरू आहे.

- सुमंत मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis Warning : ‘’आंदोलनावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका, तुमचं तोंड भाजेल’’ ; फडणवीसांचा विरोधकांना कडक इशारा!

Reliance AI: गुगल अन् 'मेटा'सोबत मिळून बनणार ‘रिलायन्स इंटेलिजन्स’, सर्वसामान्यांना असा मिळेल फायदा?

Maratha Reservation : मराठा आरक्षण मागणीसाठी भाजप आमदार आक्रमक; आमदार समाधान आवताडे यांनी केली विशेष अधिवेशनाची मागणी

Maratha Reservation Protest : मनोज जरांगेंच्या आंदोलनाला एका दिवसाची मुदतवाढ, अटीशर्तींसह परवानगी

Latest Maharashtra News Updates live: मनोज जरांगे यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात...

SCROLL FOR NEXT