soybeans have reached record price first time in 5 years in palkhed market nashik marathi news
soybeans have reached record price first time in 5 years in palkhed market nashik marathi news 
नाशिक

सोयाबीनच्या दरात मोठी उसळी! ५ वर्षाच्या तुलनेत पहिल्यांदाच विक्रमी दर

दीपक अहिरे

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : अर्जेंटिना, ब्राझील येथील बंदरावर महिनाभरापासून सुरू असलेला बंद व मध्यप्रदेश, विदर्भात पावसाने पिकाची मोठी नासाडी केल्याने सोयाबीनचा मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नाही. त्यामुळे सोयाबीन दरात अचानक उसळी आली आहे. गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत प्रथमच सोयाबीनला साडेचार हजार रूपयांची झळाळी मिळाली आहे.

चार हजार रूपये प्रतिक्विंटलने सुरुवात

पालखेड (मिरचीचे) उपबाजारात गुरुवारी (ता.७) १५ हजार क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी दाखल झाली. त्यातून ६० लाख रूपयांची उलाढाल झाली. 
सोयोबीनच्या यंदाच्या हंगामाचा प्रारंभ सरासरी चार हजार रूपये प्रतिक्विंटल अशा आकर्षक दराने झाला. काही काळ बाजारभाव स्थिर राहील्यानंतर सोयाबीनचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरवठ्याचे समीकरण बिघडले. अर्जेंटिना, ब्राझील येथून मोठ्या प्रमाणात भारतासह जगभरात सोयाबीन व तेल निर्यात होते. तेथील बंदरावर संप सुरू झाल्याने सोयाबीनचा पुरवठा खंडीत झाला. मध्यप्रदेश, विदर्भ येथेही पावसाने सोयाबीनचे पिक भुईसपाट केले.

हमीभावापेक्षा बाजारात भाव जास्त

नाशिक जिल्ह्यातील पाच लाख हेक्टरवरील सोयाबीनला पावसाने तडाखा दिला. दिवाळीनंतर पिंपळगाव बाजार समितीचे उपबाजार असलेल्या पालखेड (मिरचीचे) येथे सोयाबीनची आवक सुरू झाली. आकर्षक दराने यंदा सोयाबीनचे स्वागत झाले. यात शासनाचा हमी भाव क्विंटलला तीन हजार ८८० रूपये आहे. पण, बाजारात मात्र सरासरी चार हजार रूपये क्विंटल दर राहीला. पाच वर्षानंतर असा विक्रमी दर सोयाबीनला मिळाला आहे. आज तर सोयाबीनला प्रतिक्विंटल चार हजार ३८९ रूपये असा हंगामातील उंच्चाकी दर मिळाला. किमान तीन हजार ७०० तर सरासरी ४२०० रूये दर मिळाला. आवकेत घट झाली असून, आता दररोज १५ हजार क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी येत आहे. भाव चांगला राहिल्याने शेतकऱ्यांच्या खिशात चार पैसे पडत आहे. 


सोयोबीनला जागतिक पातळीवर चांगली मागणी आहे. चीन मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी करीत आहे. अर्जेंटिना, ब्राझीलमधून पुरवठा थांबल्याने दर साडेचार हजार रूपयांपर्यत पोहचले. मागणीपेक्षा पुरवठा कमी अशी स्थिती सध्या आहे. हेच चित्र असेच राहिल्यास अजून दोनशे ते तीनशे रूपये प्रतिक्विंटलमागे दरवाढ शक्य आहे. 
- मंगेश छाजेड, सोयाबीन व्यापारी, पालखेड 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं?

SCROLL FOR NEXT