Voter ID Sakal
नाशिक

Voter Registration: जिल्ह्यात मतदार नोंदणी व मतदार यादी शुद्धीकरणासाठी आजपासून विशेष मोहीम

सकाळ वृत्तसेवा

Voter Registration : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

त्या अनुषंगाने १२३ नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघांतर्गत २५ व २६ नोव्हेंबर २०२३ रोजी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. (Special campaign for voter registration and voter list purification from today nashik news)

या मतदार संघातील नागरिकांनी मतदान केंद्रावर उपस्थित राहून यादीत आपल्या नावाची खात्री करावी तसेच हरकत असल्यास दुरुस्तीबाबत आवश्यक कागदपत्रे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे सादर करावी, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी, १२३ नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघ तथा उपजिल्हाधिकारी भीमराज दराडे यांनी केले आहे.

२५ व २६ नोव्हेंबर २०२३ या दोन्ही दिवशी १२३ नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघाचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे त्यांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर उपस्थित राहणार आहेत.

त्याचप्रमाणे २ व ३ डिसेंबर २०२३ रोजी तृतीयपंथी, महिला सेक्स वर्कर, भटक्या व विमुक्त जमाती याप्रकारच्या वंचित घटकातील मतदारांची नोंदणी वाढविण्यासाठी विशेष शिबीराचे आयोजन केले आहे.

जास्तीत जास्त नागरिकांनी या दोनही शिबिरांचा लाभ घ्यावा व नवीन मतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवावे. तसेच नागरिकांनी आपले नाव, छायाचित्र, पत्ता दुरुस्ती, मयत नागरिकांचे नाव मतदार यादीतून कमी करून मतदार यादी शुद्धीकरण करण्यास मदत करावी. असेही मतदार नोंदणी अधिकारी, १२३ नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघ तथा उपजिल्हाधिकारी भीमराज दराडे यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT