Agriculture Minister Bhuse  sakal
नाशिक

नाशिक जिल्ह्याचा समावेश पोकरा योजनेत करा; दादा भुसेंकडे मागणी

रोशन खैरनार

सटाणा (जि. नाशिक) : नाशिक जिल्ह्याचा प्रमुख व्यवसाय शेती असल्याने जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी (PoCRA) योजनेत बागलाण तालुक्यासह संपूर्ण नाशिक जिल्ह्याचा समावेश करून जिल्ह्यातील लाखो शेतकर्‍यांना योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशी आग्रही मागणी राज्य महिला आयोगाच्या सदस्या व बागलाणच्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्याकडे केली आहे.

शेतकर्‍यांसाठी ही योजना राबविणे अत्यंत गरजेचे

याबाबत श्री. भुसे यांना दिलेल्या निवेदनात, शेती क्षेत्रात बागलाण तालुक्यासह नाशिक जिल्हा जागतिक स्तरावर अग्रेसर आहे. जिल्ह्यातील शेतकरी नैसर्गिक आणि इतर सर्व संकटांवर मात करीत मोठ्या कष्टाने पिकांचे उत्पादन घेत असतो. मात्र ऐन हंगामात येणारा अवकाळी पाऊस, गारपीट अशा विविध नैसर्गिक संकटांसह शेतमालाला उत्पादनाइतकाही बाजारभाव मिळत नसल्याने जिल्ह्यातील शेती क्षेत्र आणि शेतकरी उध्वस्त होत आहे. शेतकर्‍यांना सक्षम करण्यासाठी राज्य शासनामार्फत जागतिक बँकेच्या सहाय्याने राज्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना राबविली जात असून या योजनेअंतर्गत प्रतिकूल हवामान बदलांशी सुसंगत तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती किफायतशीर करण्यासाठी वैयक्तिक शेतकरी व शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांचे सशक्तीकरण करणे आदि लाभाच्या बाबींचा समावेश आहे. मालेगाव तालुक्यातील १४७ गावांचा या योजनेत नुकताच समावेश करण्यात आला असला तरी नाशिक जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये ही योजना राबविणे अत्यंत गरजेचे आहे. नाशिक जिल्हा हवामान बदलास अतिसंवेदनशील जिल्हा असून दरवर्षी नैसर्गिक संकटामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांचे नुकसान होत असते. या नुकसानीमुळे हतबल झालेल्या अनेक शेतकर्‍यांनी दुर्दैवाने आत्महत्याही केल्या आहेत. अशा परिस्थितीत शेती क्षेत्राला उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने नाशिक जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आवश्यक आहे.

जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी योजना वरदान ठरणार

राज्य शासनाची जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत ट्रॅक्टर, पॉवर टिलर, स्वयंचलित यंत्रे, पीक संरक्षक उपकरणे, काढणी पश्‍चात तंत्रज्ञान उपकरणे, पेरणी यंत्र, कांदा चाळ, संरक्षक शेती (पॉलिहाऊस, पॉलिटनेल, शेडनेट) फळबाग लागवड, बांबू लागवड, नवीन विहीर, ठिबक व तुषार सिंचन, वैयक्तिक व सामूहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, गोड्या पाण्यातील मत्स्यपालन, पाणी उपसा साधने (पंपसंच, पाईप), बंदिस्त शेळीपालन, परसबागेतील कुक्कुटपालन, मधुमक्षिकापालन, रेशीम उद्योग, गांडूळ व सेंद्रिय खत निर्मिती, वृक्ष लागवड, भूजल पुनर्भरण यांसह मृद व जलसंधारण कामांचा समावेश आहे. त्यामुळे ही योजना बागलाण तालुक्यासह नाशिक जिल्ह्यातील शेतकर्‍यांना वरदानच ठरणार आहे. त्यामुळे राज्य शासनाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) योजनेत बागलाण तालुक्यासह संपूर्ण नाशिक जिल्ह्याचा समावेश करावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT