Crime News esakal
नाशिक

Nashik News : नाशिक रोडला 2 गटातील वादातून रेल्वे आरक्षण केंद्रावर दगडफेक

सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड (जि. नाशिक) : औरंगाबाद येथील मजूर व सिन्नर फाटा येथील शिकलकरी यांच्या वादात नाशिक रोड येथील रेल्वे आरक्षण केंद्रावर दगडफेक झाली. यात या केंद्राचे नुकसान झाले (Stone thrown at Railway Reservation Centre by labors apprentice due to argument nashik news )

नाशिक रोड रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म चारशेजारी असलेल्या आरक्षण केंद्राच्या बाहेरील मोकळ्या मैदानावर औरंगाबाद येथील काही मजूर मुक्कामी थांबलेले होते. यातील एक मजूर लघुशंकासाठी जवळील स्वच्छतागृहामध्ये गेला असताना त्याला तेथील स्थानिक शिकलकर लोकांनी मारहाण करत त्याच्याकडून मोबाईल आणि पैसे हिसकाण्याचा प्रयत्न केला.

त्या मजुराने आरडाओरड केल्याने त्याच्यासोबत असलेले काही मजूर लोकही तिकडे धावले. त्यानंतर शिकलकर व त्यांच्यात हाणामारी झाली. ती बघून स्थानिक शिकलकर मोठ्या संख्येने हातात कोयते, दांडे घेऊन आले अन् मजुरांना मारझोड करण्यास सुरवात केली.

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

हे मजूर आरक्षण केंद्राकडे पळत तेथे शिरले. त्यांच्यावर शिकलकर लोकांनी दगडफेकही केल्याने आरक्षण केंद्राच्या काचा फुटल्या. त्यामुळे आरक्षण केंद्रातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

आरक्षण काढण्यासाठी आलेले प्रवासीही या घटनेने गांगरले. घटनेची माहिती रेल्वे पोलिस व आरपीएफला कळताच त्यांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. स्थानकावरील कुलींनी जखमी मजुरांना उपचारासाठी नाशिक रोड येथील महापालिकेच्या ठाकरे रुग्णालयात हलविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA 5th T20I: लखनौचा सामना 'धुक्यात' हरवला; आता भारत-दक्षिण आफ्रिका पाचवा सामना कधी व कुठे होणार, ते पाहा...

Nagpur News: डागा रुग्णालयात नवजात शिशूचा मृत्यू, नातेवाईकांचा गोंधळ, वैद्यकीय अधीक्षकांचे चौकशीचे आदेश

Viral Video: 'अरे पैसा नही चाहिये', रेल्वे स्टेनशवरील बाप-लेकीची गोड व्हिडिओ व्हायरल

पिंजऱ्यात शिकार, जंगलात राज! वाघीण 'तारा'ची सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दणक्यात एन्ट्री, शास्त्रीय पद्धतीने कशी राबवली 'सॉफ्ट रिलीज'?

Atal Bihari Vajpayee : राष्ट्रपतिपद स्वीकारण्यास वाजपेयींचा होता नकार; तत्कालीन माध्यम सल्लागार अशोक टंडन यांच्या पुस्तकात दावा

SCROLL FOR NEXT