Scholarship esakal
नाशिक

शिष्यवृत्ती अर्जासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ

अरुण मलानी

नाशिक : महाडीबीटी (Maha DBT) पोर्टलवरुन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी (Scholarship) अर्ज भरणे तसेच संबंधित अर्जांची महाविद्यालय व विभाग स्‍तरावरुन पडताळणी करण्यास मुदतवाढ दिलेली आहे. त्‍यानुसार येत्‍या ३० जूनपर्यंत ही प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे.

शिक्षण सहसंचालक विभागाने यासंदर्भात परिपत्रक जारी करताना सविस्‍तर सूचना दिलेल्या आहेत. त्‍यानुसार विद्यार्थ्यांच्‍या हिताच्‍या दृष्टीने, उच्च शिक्षण संचालनालयामार्फत हा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या चौदा शिष्यवृत्ती योजनांसाठी २०२०-२१ करीता ज्‍या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती त्रुटी पूर्तता करुन रि-अप्‍लाय करण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. तसेच २०२१-२२ करीता ज्‍या विद्यार्थ्यांनी अद्यापही अर्ज भरलेले नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्यासाठीदेखील ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. या प्रक्रियेतील पुढील टप्‍यात संबंधित महाविद्यालय व विभागीय पातळीवरुन अर्जावर याच मुदतीत प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT