नाशिक

धुळे टुडे ॲंकर शेजारी

CD
धुळे ः टुडे १ साठी....ॲंकरच्या शेजारी --- निवृत्तिवेतनधारकांनी ३० पर्यंत हयातीचे दाखले सादर करावेत कोषागार कार्यालयातर्फे डिजिटलसह पाच पर्याय सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १५ : जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत निवृत्तिवेतन घेणारे शासकीय निवृत्त अधिकारी, कर्मचारी, तसेच कुटुंब निवृत्तिवेतनधारकांनी २०२६- २०२७ या वर्षासाठीचे हयातीचे दाखले ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत सादर करावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी वि. दे. डाखोरे, निवृत्तिवेतन शाखेचे उपकोषागार अधिकारी नितीन नंदन यांनी केले आहे. निवत्तिवेतन आणि कुटुंब निवृत्तिवेतनधारकांची दर वर्षी नोव्हेंबर महिन्यात हयातीबाबत नियतकालिक ओळख पडताळणी केली जाते. त्यासाठी कोषागार कार्यालयाकडून निवृत्तिवेतनधारकांचे नाव, निवृत्तिवेतन क्रमांक आणि बँक खाते क्रमांक नमूद असलेले मुद्रित दाखले संबंधित बँक शाखांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पेन्शनधारकांनी ३० नोव्हेंबरपर्यंत विहित मुदतीत हे दाखले सादर करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन आहे. पाच सोपे पर्याय ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन सुविधा आहे. निवृत्तिवेतन जमा होणाऱ्या बँक शाखेत जाऊन बँक अधिकाऱ्यांसमक्ष मुद्रित दाखल्यावर स्वाक्षरी करावी. jeevanpramaan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून डिजिटल पद्धतीने दाखला सादर करता येईल.अँड्रॉइड किंवा आयओएस मोबाईलवर Jeevan Pramaan ॲप डाउनलोड करून घरबसल्या ऑनलाइन दाखला देता येईल. भारतीय डाक विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या (IPPB) माध्यमातूनही डिजिटल हयातीचा दाखला सादर करण्याची सोय आहे. विहित नमुन्यातील दाखल्यावर बँक अधिकारी किंवा राजपत्रित अधिकाऱ्याची स्वाक्षरी घेऊन तो थेट जिल्हा कोषागार कार्यालयात जमा करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यातील ३४ हजार न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर जाणार! मंगळवारपासून कामकाज ठप्प होणार? नेमक्या मागण्या काय?

वंदे भारत ट्रेनचे ब्रेक फेल, तरी ४६३ किमी धावली; रेल्वेच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड, नेमकं काय घडलं?

''आता सेल्फी पोस्ट केली की...''; PM मोदींच्या 'त्या' विधानावरून CJP ची उपरोधिक टीका, नेमकं काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update : वाहनाच्या धडकेत सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू, वाहनचालक धडक देऊन पसार, सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू

Tiruchendur Soorasamharam 2026 : समुद्रकिनाऱ्यावर लाखोंचा जनसागर, ४,१०० पोलिसांचा कडेकोट पहारा! दक्षिण भारतातील 'या' प्रसिद्ध मंदिरात रंगला ऐतिहासिक सोहळा

SCROLL FOR NEXT