Two sisters, Sunanda and Ashwini Kadale, joined the police force at the same time and both of them succeeded in this. esakal
नाशिक

Success Story : एकाचवेळी सख्या बहिणींना खाकी वर्दी! दातलीच्या कडाळे भगीनींची भरारी

सकाळ वृत्तसेवा

Success Story : कष्टाने कोणतेही गोष्ट शक्य होते याची प्रचिती ग्रामीण भागातील दातली येथील कडाळे कुटुंबीयातील दोन सख्ख्या बहिणीनी आणून दिली. दिवसरात्र मेहनत, अभ्यास, कष्ट करून त्यांनी एकाचवेळी खाकी वर्दी मिळविली.

त्यांच्या ययशामुळे सिन्नर तालुक्यातच नव्हे तर पंचक्रोशीतून त्यांचे अभिनंदन होत आहे. दातली येथील सुनंदा व अश्विनी कडाळे या दोन्ही सख्या बहिणींनी एकाचवेळी पोलिस भरतीत यश मिळवित दोघींनी यश मिळविले.

शेळीपालन व शेतमजुरी करून उदरनिर्वाह करत असलेल्या कुटुंबातील या मुलींनी मेहनत, जिद्ध व चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले. (Success Story Datli Kadale sisters selected police force for sisters at same time nashik news)

स्वतःची गुंठाभरही जमीन नसलेले विश्वनाथ कडाळे, पत्नी कुसुम, दोन मुलं आणि दोन मुली असलेल्या या कुटुंबाचा संपूर्ण उदरनिर्वाह शेळीपालन आणि शेतमजुरीवर... कडाळे यांची मोठी मुलगी सुनंदा हिचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते.

मात्र, तीन वर्षांपूर्वी तिच्या पतीने निधन झाल्यानंतर ती आपल्या पाच वर्षांच्या मुलीसह माहेरी राहायला आली. पतीच्या जाण्याने नैराश्यात न जात तिने स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा निर्णय घेतला.

कडाळे यांची लहानी मुलगी अश्विनीचेही नुकतेच लग्न झाले असून तिच्या सासरची आर्थिक परिस्थितीही हलाखीची आहे. त्यामुळे अश्विनीनेही बहिणीसोबत माहेरी राहून पोलिस दलात जाण्याचा निर्धार केला. यासाठी दोघींनी सिन्नर येथील एका करिअर अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला. पोलिस भरतीचा सराव सुरु केला.

रात्री उशिरापर्यंत अभ्यास करुन पुन्हा पहाटे उठून मैदानावर कसरत करण्यासाठी दोघी बहिणी सोबतच जात असत. बसचा पास काढण्यासाठी पैसे राहत लासल्याने, प्रसंगी पायी, कुणाच्याही वाहनांना हात देऊन त्या अॅकडमीला जात असत.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

कुटुंबाची खंबीर साथ व अकॅडमीतील मार्गदर्शनामुळे त्यांना सराव करण्यासाठी ऊर्जा मिळत गेली. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यातच दोघींनीही पोलिस दलात भरती होत आपल्या कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले. दोघींचीही पुणे शहर पोलिसात निवड झाली आहे.

एकाच कुटुंबातील दोन्ही बहिणी पोलिस दलात भरती झाल्याने ही गोष्ट इतर युवकांना प्रोत्साहन आणि प्रेरणा देणारी ठरत आहे. माणसांच्या अंगी जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे या बहिणींनी सिद्ध करून दाखवले आहे.

"तीन वर्षांपूर्वी पतीचे निधन झाल्याने नैरास्यात गेले होते. आई-वडिलांचीही परिस्थिती बिकट होती. लहान मुलीचा सांभाळही करावा लागणार होता. आई-वडिलांना आधार म्हणून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी पोलिस दलात जाण्याचा निर्धार केला व सहा महिन्यात आम्ही दोघी बहिणींनी दुप्पट मेहनत घेऊन खाकी वर्दी मिळवली." - सुनंदा कडाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: कोल्ड्रिफ सिरप (Batch No. SR-13) चा तात्काळ वापर थांबविण्याचे एफडीएचे आदेश

Hampi Tourism: फक्त 2 दिवसात हंपी एक्सप्लोर करायचंय? ही ठिकाणं नक्की पाहा!

INDW vs PAKW: ४,४,४ प्रतिकाने केलेली सुरुवात अन् मग ऋचाच्या आक्रमणाने केला शेवट; भारताचे पाकिस्तानसमोर मोठे लक्ष्य

Jayakumar Gore: रामराजेंचं प्रेम करायचं वय निघून गेलंय: पालकमंत्री जयकुमार गोरे; रणजितसिंहांकडे मैत्रीचा हात पुढे केला अन्..

अब मजा आयेगा ना भिडू! प्रियाचे खरे आई-वडील अखेर सापडलेच; खोटी तन्वी प्रतिमाला त्रास देताना रविराज स्वतः पाहणार, आजच्या भागात काय घडणार?

SCROLL FOR NEXT