Father Sanjay Khairnar, mother Kalpana and family celebrating their first rank in the state in the Maharashtra Public Service Commission examination.
Father Sanjay Khairnar, mother Kalpana and family celebrating their first rank in the state in the Maharashtra Public Service Commission examination. esakal
नाशिक

Success Story : सहाय्यक नगर रचनाकारच्या परीक्षेत लखमापूरचा हर्शल खैरनार राज्यात प्रथम

सकाळ वृत्तसेवा

Success Story : येथील हर्शल संजय खैरनार (ह. मु. नाशिक) याने महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या नगररचना व मूल्य निर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील सहाय्यक नगर रचनाकार, महाराष्ट्र शहर नियोजन व मूल्यनिर्धारण सेवा श्रेणी एक गट-ब या संवर्गातील परीक्षेत राज्यातून प्रथम क्रमांक मिळवला.

हर्शलवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हर्शल ‘सकाळ’चे बातमीदार सुनील खैरनार यांचा पुतण्या आहे. (Success Story Harshal Khairnar of Lakhmapur stands first in State in Assistant Town Planner MPSC Exam Nashik News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या नगररचना व मूल्य निर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील सहाय्यक नगर रचनाकार, महाराष्ट्र शहर नियोजन व मूल्यनिर्धारण सेवा श्रेणी एक गट-ब या संवर्गातील १३८ पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा घेतली होती.

२० नोव्हेंबर २०२२ या दिवशी मुख्य परीक्षा झाली. या मुख्य परीक्षेतून उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींची ९ ते १७ मे २०२३ या कालावधीत व्यक्तिमत्त्व चाचणी (मुलाखत) झाली. शुक्रवारी (ता. १९) आयोगाने घोषित केलेल्या निकालात हर्शल खैरनार याने राज्यातून प्रथम क्रमांक पटकावत नाशिकचा गौरव वाढविला आहे.

"महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा आजचा निकाल नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मोठी प्रेरणा देणारा आहे. प्रामाणिक प्रयत्न आणि कठोर मेहनतीने असाध्य साध्य करता येऊ शकते, हे हर्शलच्या उत्तुंग यशाने सिद्ध केले आहे. हर्शलच्या भावी प्रशासकीय वाटचालीसाठी अनेकोत्तम शुभेच्छा!"- राम खैरनार, संचालक, युनिव्हर्सल फाउंडेशन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : तिथं जा नाश्ता वगैरे करा अन्... उद्धव ठाकरेंच्या भेटीपूर्वी अमित शाहांना फडणवीस काय म्हणाले होते?

Indian Economy: भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आनंदाची बातमी! UNने 2024 साठी जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला

Jalgaon News : दूषित पाण्याच्या नमुन्यांमध्ये लक्षणीय घट; डेंग्यूबाबत आरोग्य यंत्रणेच्या उपाययोजनांना यश

Latest Marathi News Live Update : धक्कादायक! पुण्यात कोयत्याने सपासप करुन तरुणाचा टोळक्याकडून खून

परदेशात पळून गेलेला खासदार भारतात आलाच नाही; आता 'रेड कॉर्नर नोटीस' बजावणे हाच एकमेव मार्ग शिल्लक!

SCROLL FOR NEXT