Mayur gawari esakal
नाशिक

Success Story : मखमलाबादचा मयूर बनला कल्पक्कम अणुकेंद्रात शास्रज्ञ!

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी (जि. नाशिक) : मखमलाबाद परिसरातील एलआयसी अधिकारी व लेखक डॉ. गोपाळ गवारी व डॉ. संगीता गवारी यांचा मुलगा मयूर याची गुणवत्तेच्या बळावर कल्पक्कम (तामिळनाडू) येथे अणुसंशोधन शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. भारतामधून केवळ सतरा तरूणांची निवड करण्यात आली, त्यात मयूर हा महाराष्ट्रातील एकमेव आहे. त्यामुळे त्याच्या निवडीबद्दल कौतुकाचा वर्षाव होत आहे. (Success Story mayur of Makhmalabad became scientist in Kalpakkam nuclear power station nashik news)

हेही वाचा : जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

मयूरचे शिक्षण आदर्श मराठी शाळा, नाशिकरोड, माध्यमिक पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल नाशिकरोड आणि छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, मखमलाबाद येथे झाले आहे. दहावीच्या परिक्षेत तो ९५ टक्के मार्क मिळवून उत्तीर्ण झाला होता. अकरावी आणि बारावी त्याने केटीएचएम महाविद्यालयातून केली असून त्यात ९० टक्के गुण मिळाले होते. पुढे त्याने गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयातून मेकॅनिकल पदवी घेत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथून एम. टेक केले आहे.

चित्रकला विषयात त्यास अनेक बक्षिसे मिळविली आहेत. पुण्यात असताना तो एका निवृत्त प्राचार्याकडे राहत असताना त्याने सुजन कुपन प्रा. लि.कंपनीत त्याने दोन वर्षे नोकरी केली. देशासाठी आपल्या शिक्षणाचा उपयोग झाला पाहिजे या हेतूने त्याने नोकरी सोडून अभ्यासावर लक्ष केंद्रित करत शास्रज्ञ होण्याचे स्वप्न बाळगले. एप्रिल २०२२ मध्ये त्याने यासाठी परीक्षा दिली होती.

त्यात त्याची ‘टेक्निकल ऑफिसर ( मेकॅनिकल) म्हणून निवड झाली होती. मयूर गेल्या २१ डिसेंबर २०२२ कल्पक्कम येथे रुजू झाला आहे. मयूर गवारीच्या यशाबद्दल मखमलाबाद ग्रामस्थ, वाचनालयाचे अध्यक्ष रामदास पिंगळे, मविप्र संस्थेचे संचालक रमेश पिंगळे, माजी नगरसेवक पुंडलिकराव खोडे, डॉ. जगन्नाथ तांदळे, दामोधर मानकर आदी ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT