Sudhakar Badgujar Sakal
नाशिक

जनतेसाठी गुंड झाल्याचा अभिमानच - सुधाकर बडगुजर

प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक) : जुन्या शिवसैनिकांनी नुसता हातात भगवा घेऊन मिरविला नाही तर वेळप्रसंगी झेंड्याचा दांडासुद्धा भ्रष्टाचारी लोकांच्या रक्ताने भगवा केलेला आहे. जुन्या शिवसैनिकांना काही ज्ञानी गुंड म्हणायचे पण जनतेसाठी गुंड झालो याचा अभिमानच आहे. नाहीतर गप्प बसणारे षंढ नाहीत असे आवर्जून सांगावेसे वाटते, असे प्रतिपादन शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केले.

येथील माऊली मंगल कार्यालयात आयोजित जुन्या ज्येष्ठ शिवसैनिकाशी संवाद या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. बडगुजर म्हणाले, की जुने शिवसैनिक बोलतात ही त्यांची मर्दुमकी आजच्या घडीला शिवसैनिकांत असायला हवी. त्यावेळेस पक्षाचा नेता खूप काही श्रीमंत नसायचा पण उपाशीपोटी प्रचार करून जुन्या शिवसैनिकांनी शिवसेना गावागावात पसरवली. ही पक्षनिष्ठा आजच्या पिढीच्या शिवसैनिकात असायला हवी. याप्रसंगी मामा ठाकरे, प्रवीण तिदमे, पुंजाराम गामणे, मंदाताई दातीर, सचिन राणे, राकेश दोंदे, राजेंद्र नानकर, कैलास चुंबळे यांनी ही शिवसेना पक्षवाढीसंदर्भात सूचना करत मत मांडले. प्रास्ताविक शिवसेना विधानसभा समन्वयक सुभाष गायधनी यांनी केले. बाळासाहेब दळवी, राजा खांबेकर, योगेश बेलदार, बालम शिरसाट, वसंत पाटील, प्रताप मटाले, नीलेश साळुंके, सुरेश पाटील, दादाजी अहिरे, राजेंद्र वाकसरे, मयूर परदेशी, बबलू सूर्यवंशी, भूषण राणे, अजित काकडे, किरण शिंदे, दादा मेढे, आबा सोनवणे, सतीश खैरनार, संतोष सैंदाणे, राहुल सोनवणे, संदीप चौधरी, शरद दातीर, आबा पाटील, नदेश ढाले, राहुल पाटील, अविनाश काकडे, अमेय जाधव, पी. एस. राजपूत आदी जुने, नवे शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

जुन्या शिवसैनिकांची मोट

शिवसेना महानगरप्रमुख झाल्यानंतर बडगुजर यांनी नाशिक शहरात भगवेमय वातावरण केल्याचे दिसून येते. सुरवातीला युवासेना, युवतीसेना, महिला आघाडी व शाखा उद्‌घाटनाचे कार्यक्रम झाले. त्यानंतर सलग दीड महिना रक्तदान शिबिर घेण्यात आले व आता जुन्या ज्येष्ठ शिवसैनिकांना एकत्र करून त्यांची मोट बांधण्याचे बडगुजर करताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur politics : कारे दुरावा कारे अबोला! मंत्री आबिटकर-मुश्रीफ यांच्यातील नाराजी उघड, बँकेच्या अहवालात पालकमंत्र्यांचा फोटोच नाही

Rain-Maharashtra Latest live news update: गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला

Stock Market Opening: सेन्सेक्स 27 अंकांच्या वाढीसह उघडला; बँकिंग शेअर्समध्ये विक्री, कोणते शेअर्स वाढले?

Dhanashree Verama: युझवेंद्र चहलच्या 'Sugar Daddy' टी शर्टवर धनश्रीची जोरदार टीका; म्हणाली, मी कोर्टात रडले आणि तो...

Pune Rain Alert : पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT