Sugarcane workers tortured mothers and daughters 
नाशिक

ऊसतोड कामगार माय-लेकीवर अत्याचार

मुकादमासह मुलाच्या तावडीतून पीडितांची सुटका

सकाळ वृत्तसेवा

नांदगाव : ऊसतोड मुकादमाच्या मुलाने आपल्या अल्पवयीन मुलीशी बळजबरी केल्याची तक्रार करणाऱ्या आईला मुकदमाने मुलाला समज देण्याचे सोडून पीडित मुलीच्या आईलाच आपल्या वासनेची शिकार बनविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने नांदगाव, वैजापूर, नेवासा, श्रीरामपूर भागातल्या उसपट्ट्यात खळबळ उडाली आहे.

पीडित माय- लेकी नांदगाव तालुक्यातील एका खेड्यातील आहेत. याप्रकरणी शिऊर पोलिसांनी शून्य क्रमांकाने दाखल केलेला गुन्हा नेवासा पोलिसांकडे वर्ग केला आहे. नांदगावच्या सामाजिक कार्यकर्त्या ॲड. विद्याताई कसबे यांच्या आधार बहुउद्देशीय विकास संस्थेच्या व ‘फ्रिडम फर्म’ या स्वयंसेवी संस्थेच्या एकत्रित पाठपुराव्याचा परिणाम म्हणून अत्याचार करणारा मुकादम व त्याच्या मुलाला नेवासा पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

नांदगाव तालुक्यातील एका खेड्यातील चौकोनी कुटूंब उसतोडीचे काम करते. वैजापूर तालुक्यातील वडजी येथील जिब्राइल बाबू शेख हा मुकादम म्हणून ऊसतोडणीसाठी विविध भागातून मजूर पुरविण्याचे काम करतो. श्रीरामपूर जवळील अशोक कारखान्याला लागणारे मजूर शोधण्यासाठी तो नांदगाव तालुक्यातील पीडीत कुटूंबाला भेटला. कुटूंबप्रमुखाने जिब्राइलकडून २०१८ मध्ये एक लाख वीस२० हजार रुपयांची कामाच्या मोबदल्यात उचल घेतली. कारखान्याच्या साईटवर ऊसतोडणीचे काम सुरु असताना या मुकादमाचा मुलगा अन्वर याने या मजुरांच्या कुटूंबातील पंधरा वर्षीय मुलीला बळजबरी केली. ही घटना मुलीच्या आईला समजल्यावर तिने मुकादमाकडे तक्रार केली. मात्र, मुकादमाने समजून सांगण्याऐवजी संबंधित तक्रारदार महिलेला शिवीगाळ केली व पुढे पैशांचे आमिष दाखवत मुलीच्या आईशीच संबंध ठेवला.

एकीकडे बाप तर दुसरीकडे मुलगा या दोघाकडून आई व मुलीवर अत्याचाराचे सत्र सुरूच होते. भीतीपोटी सुरु असलेल्या या अत्याचाराची परिसीमा मुलीला दिवस जाण्यात झाली. तिचा वैजापूरला गर्भपात करण्यात आला. हा सगळा असहाय प्रकार पीडित महिलेने नांदगाव येथील बहिणीच्या कानावर घातला. बहिणीने आधार बहुउद्देशीय विकास संस्थेच्या ॲड. विद्याताई कसबे यांना घटना सांगितली. ॲड. कसबे यांनी येवल्यातील सीमा आरोळे, कॅथलिन जोगराव व पुण्यातील सहकारी संस्थेतील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन या अत्याचाराला वाचा फोडली. त्यांच्या उपस्थितीत वैजापूर तालुक्यातील शिऊर पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा शून्य क्रमांकाने गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा नेवासा पोलिसांकडे वर्ग

तपासात वडजी येथून मुकादम जिब्राइल, त्याचा मुलगा अन्वर या दोघांना ताब्यात घेत पोलिसांनी त्याच्याच घरात बंधक असलेल्या पीडित माय- लेकींसह अजून एका बारा वर्षीय मुलीची सुटका केली. अत्याचाराच्या घटना नेवासा तालुक्यातील खेड्यात घडल्याने हा गुन्हा नेवासा पोलिसांकडे वर्ग झाला. दुपारी गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते. सायंकाळी नेवासा याठिकाणी पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पीडित माय- लेकींना मुकादम व त्याचा मुलगा दोघांना शिऊर पोलिसांनी नेवासा पोलिसांच्या स्वाधीन केले. नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते. अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pink E-Rickshaw Scheme: पिंक ई-रिक्षाचा वेग नागपुरात ‘स्लो’; १४०० पैकी केवळ सोळाच रस्त्यावर, महिलांना स्वावलंबी बनविणारी योजना

Latest Marathi News Updates : - पंढरपुरात जोरदार पाऊस

Hingoli News: अडीच तासांची थरारक प्रतीक्षा; पुरात अडकलेल्या युवकाला ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून वाचवले

झुपेडियानं लुटलं! फोटोला रिव्ह्यू देताच पैसे मिळणार, स्कीमने गंडवलं; तरुणांसह शिक्षक अन् कर्मचाऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक

Crime News: प्रेमविवाहाचा भीषण शेवट! पतीने पत्नीला रस्त्यावर गोळ्या घालून संपवलं, मृतदेहाजवळ पिस्तूल घेऊन उभा राहीला

SCROLL FOR NEXT