Suicide of married woman due to harassment Nashik News
Suicide of married woman due to harassment Nashik News esakal
नाशिक

मूल होत नसल्याने होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

सतीश निकुंभ

सातपूर (जि. नाशिक) : दुसरे लग्न करण्याची धमकी देत सतत पत्नीचा छळत (Domestic Violence) होत असल्याने त्याला कंटाळून पत्नीने घराशेजारील झाडाला गळफास घेत जीवन संपविल्याची घटना त्र्यंबकरस्त्यावरील वासळी गावात घडली आहे. मुलीच्या वडिलांच्या फिर्यादी वरून जावयासह सासऱ्यांविरोधात सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लग्नाला अनेक वर्षे होऊनही मूल होत नसल्याने कृष्णा गोविंद सोहळे (रा. वासाळी) व पत्नी मैनाबाई कृष्णा सोहळे यांच्यात नेहमीच वाद होत होते. अनेकदा पती कृष्णा हा मूल होत नसल्याने दुसरे लग्न करण्याची धमकी देत मैनाबाईला दारूच्या नशेत मारहाणही करत होता. रोजच्या या छळाला कंटाळून मैनाबाईने १४ एप्रिलला सकाळी घराच्या शेजारी असलेल्या बाभळीच्या झाडाला गळफास घेतला. तशी फिर्याद मुलीचे वडील मधुकर लखमा वाघ (रा. ढोगडीपाडा, ता.त्र्यंबकेश्‍वर) यांनी सातपूर पोलिस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी पती कृष्णा व सासरे गोविंद गंगा सोहळे (रा. दुगारवाडी) यांच्या विरोधात छळ आणि आत्महत्येस प्रवृत्ते केल्याचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक शाम जाधव तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : साताऱ्यात आज दिग्गजांच्या तोफा धडाडणार; शरद पवार, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात प्रचार सभा

Paneer Stuffed Chilla: विकेंडला बनवा पनीर स्टफ चिला, नोट करा रेसिपी

Sakal Podcast : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेलं नंदुरबार यंदा कोण जिंकणार? ते देशासमोर पाण्याचे संकट

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 04 मे 2024

SCROLL FOR NEXT