जालना : संपूर्ण ऊसाचे गाळप होईल

माजी केंदीय कृषी मंत्री शरद पवार
Sharad pawar
Sharad pawarSakal

अंकुशनगर (जि. जालना) - मराठवाड्यातील जालना, बीड, नांदेड जिल्ह्यात अधिक ऊस शिल्लक आहे. यासाठी ऊस तोंडणीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील यंत्रणा येथे राबून हा सर्व ऊस साखर कारखाने घेऊन जातील, त्यामुळे या जिल्ह्यातील अतिरिक्त संपूर्ण ऊसाचे मे अखेरपर्यंत गाळप पूर्ण होईल, असे माजी केंदीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी (ता. १६) म्हटले आहे.

माजी केंदीय कृषिमंत्री शरद पवार हे जालना दौऱ्यावर असून ते अंबड तालुक्यातील महाकाळा- पार्थवाला शिवारातील वसंत दादा शुगर इन्स्टिट्युट पुणे या संस्थेच्या कामाचीशनिवारी (ता.१६) पाहिणीसह आढावा घेतला. यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, आमदार रोहित पवार, आमदार विक्रम काळे, माजी खासदार जयसिंगराव गायकवाड, बी.बी. ठोंबरे, माजी आमदार अरविंद चव्हाण, माजी आमदार चंद्रकांत दानवे, वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटचे महासंचालक शिवाजीराव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख आदींची उपस्थिती होती.

यावेळी श्री. पवार यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या १०८ एकर क्षेत्राची पाहणी करून १५ एकर ऊस बियाणे लागवडीची पाहणी केली. यावेळी बोलताना श्री.पवार म्हणाले, की राज्यात साखर कारखाने वाढत आहेत. या वाढत्या साखर कारखान्याना उत्तम दर्जाचे ऊस बियाणे व कुलशल कामगारांची गरज आहे.त्याचा एक भाग म्हणून पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटचे मराठवाड्यात पाहिले केंद्र येथे होत आहे. या ठिकाणी ऊस बियाणे माळा व शेतकरी प्रशिक्षिण केंद्र व प्रशिक्षणासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची व्यवस्था हे पुढील दोन ते तीन वर्षात होऊ पुणे प्रमाणे कृषी विभाग केंद्र येथे निर्माण होईल, असे ही श्री.पवार म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com