नाशिक

दुष्काळाच्या संकट काळात जिव्हाळा जपा,शेतकऱ्यांना धीर द्या..! येवल्यात समीर भुजबळाकडून कार्यकर्त्यांसमवेत दिवाळीचा स्नेहमेळावा

CD
पान-३--ॲंकर ------------------ YEO26B27447 येवला : येथील संपर्क कार्यालयात पदाधिकारी- कार्यकर्त्यांशी संवाद साधताना माजी खासदार समीर भुजबळ. ------------- दुष्काळी स्थिती शेतकऱ्यांना जपा, धीर द्या! --------------- येवल्यात समीर भुजबळांकडून दिवाळी स्नेहमेळावा ः पाण्याचे नियोजन समन्वयातून करावे ------------- सकाळ वृत्तसेवा येवला, ता.१३ : यंदाचा दुष्काळ अधिक गंभीर असून या संकटकाळात एकमेकांसोबत जिव्हाळा जपत पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शेतकरी बांधवांना धीर देत गावोगावी जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधावा, त्यांच्या अडचणी समजून घेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे. समन्वयातून पाण्याचे योग्य नियोजन करण्याचे प्रयत्न करावेत, असे आवाहन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले. -------------- दीपावलीनिमित्त येथील संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांसमवेत झालेल्या स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. मंत्री छगन भुजबळ आणि भुजबळ परिवारातर्फे उपस्थितांना दिवाळीचा फराळ व मिठाई देऊन दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. डॉ. शेफाली भुजबळ तसेच ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, ज्येष्ठ नेते विश्वास आहेर, माजी सभापती संभाजी पवार, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, हुसेन शेख आदींची उपस्थिती होती. श्री. भुजबळ म्हणाले,‘ यंदा कमी पावसामुळे ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर झाल्याने पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर, पिण्याच्या पाण्याला प्राधान्य आणि संभाव्य टंचाईचे आतापासूनच नियोजन करावे. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात, त्यांना धीर द्यावा आणि या संकटातून बाहेर काढण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करावेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली असून, मंत्री छगन भुजबळ हे पाणीटंचाई, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि ग्रामीण भागातील प्रश्नांवर शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. गरजूंना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी आपणही प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, भाऊसाहेब भवर, शहराध्यक्ष दत्ता निकम, किसन धनगे, मोहन शेलार, डॉ. सुधीर जाधव, ज्ञानेश्वर दराडे, रतन बोरणारे, सचिन कळमकर, राजेश भांडगे, मकरंद सोनवणे, अमोल शिंदे, भाऊसाहेब बोचरे, सुहास भांबारे, दत्तात्रेय रायते, दत्तूपंत डुकरे, गोटू मांजरे, निसार शेख, तानाजी आंधळे, बाळासाहेब गुंड, नवनाथ काळे, अल्केश कासलीवाल, संतोष खैरनार, भाऊसाहेब धनवटे, भूषण लाघवे, सुमीत थोरात आदी उपस्थित होते. ------- १६-२ चौकट मदतीसाठी प्रशासनाशी समन्वय ठेवा दुष्काळाचा परिणाम शेतीबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्था आणि पशुधनावरही होत असल्याने चारा व पाण्याची उपलब्धता महत्त्वाची आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गावागावांतील परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासनाशी समन्वय साधावा, गरजू शेतकरी व पशुपालकांपर्यंत मदत पोहोचवावी आणि शासनाच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहनही समीर भुजबळ यांनी केले. ----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ, 4th ODI: विराट, रोहित, श्रेयस यांना पहिल्याच ओव्हरमध्ये कसं आऊट केलं? मॅट हेन्री म्हणाला, 'हे खूप मजेदार होतं...'

India Export: भारताच्या निर्यातीत 30 टक्क्यांची मोठी झेप; ऑक्टोबरमध्ये 8.47 लाख कोटींची निर्यात, व्यापार तुटीतही घट

'आग ये सुंदरा...तुझा माझा गो शोभल जोडा' आगरी कोळी गाण्यावर ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, नेटकरी म्हणाले...

MPSC गट-क भरती; १६,७१७ पदांसाठी आजपासून भरता येणार अर्ज; आधी फॉर्म भरलेल्यांनाही मिळणार नव्या संवर्गांचा पर्याय

Latest Marathi News Live Update: उदापूर येथे सुपर कॅरी गाडीची दुचाकीला धडक; २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT