arrested suspect
arrested suspect esakal
नाशिक

Nashik : मोबाईल टॉवर बॅटरी चोरीप्रकरणी फरार संशयित ताब्यात

- युनूस शेख

जुने नाशिक : गंजमाळ येथील जिओ (JIO) कंपनीच्या मोबाईल टॉवर बॅटरी चोरी (mobile tower battery theft case) प्रकरणी फरार संशयितास भद्रकाली गुन्हे शोध पथकाकडून गुरुवारी (ता. २) रात्री नानावली येथून अटक (Arrest) करण्यात आली. गेल्या १६ दिवसांपासून तो फरार होता. (suspect in mobile tower battery theft case arrested Nashik News)

भद्रकाली गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी गुन्हा दाखल होताच अवघ्या काही वेळातच गुन्हा उघडकीस आणून संशयित पांडू हनुमंत शिंगाडे (१८, रा. पंचशीलनगर) यास ताब्यात घेतले. त्याचा सहकारी संशयित फरार होता. फरारी संशयित नानावलीत असल्याची माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, रमेश कोळी, सागर निकुंभ, विशाल काठे, लक्ष्मण ठेपणे, धनंजय हासे, उत्तम खरपडे यांनी संशयितास ताब्यात घेतले. समीर हमिद शहा (२५, रा. गंजमाळ), असे ताब्यात घेतलेल्या फरारी संशयिताचे नाव आहे. त्यास शुक्रवारी (ता. ३) न्यायालयात हजर केले असता, एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : पुण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर निशाणा

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

IPL 2024, KKR vs DC Live Score: स्टार्कने दिल्लीला दिला दुसरा मोठा धक्का! धोकादायक फ्रेझर-मॅकगर्कला धाडलं माघारी

SCROLL FOR NEXT