Crime News
Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : पत्रकार मारहाण प्रकरणी संशयितांना कोठडी

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : शहरातील ठक्कर डोम येथे नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या लावणीच्या कार्यक्रमात हुल्लडबाजांनी प्रसार माध्यमांच्या दोन प्रतिनिधींना बेदम मारहाण प्रकरणात अटक केलेल्या सहा संशयितांना न्यायालयाने एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात मारहाणीसह, पत्रकार संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Suspects in journalist assault case in custody Nashik Crime News)

समीर इस्माईल शेख (२८), जयेश पुंडलिक भडांगे (१८), एकनाथ प्रीतम परदेशी (२४), जितेश शिवाजी जाधव (२३), दीपक प्रकाश दाभाडे (२५, सर्व रा. उत्कर्षनगर झोपडपट्टी, त्र्यंबक रोड, नाशिक), आकाश प्रकाश पवार (२५, रा. लवटेनगर), अशी संशयितांची नावे आहे.

या संशयितांना गुरुवारी (ता. १८) न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने एका दिवसाची पोलिस कोठडी दिली. प्रसार माध्यमाचे कॅमेरामन आकाश येवले यांच्या फिर्यादीनुसार, मंगळवारी (ता. १६) त्र्यंबक रोडवरील ठक्कर डोम येथे नवनिर्माण सेवाभावी संस्थेने नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या लावणीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

होते. यासाठी प्रसार माध्यमांचे प्रतिनिधीही वृत्त संकलनासाठी उपस्थित होते. त्या वेळी संशयितांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढविला. या हल्लेखोरांनी येवले यांच्यासह कॅमेरामन अशोक गवळी यांना मारहाण केली.

यात त्यांच्याकडील कॅमेऱ्याचेही नुकसान झाले. गंगापूरचे पोलिसांनी कार्यक्रम स्थळावरील फुटेजच्या आधारे संशयितांना अटक केली. गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख हे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : पुण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर निशाणा

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

SCROLL FOR NEXT