IGT26B08942
सर्वतीर्थ टाकेद : येथील कातकरी वस्तीतील नागरिकांना जात प्रमाणपत्राचे वाटप करताना नायब तहसीलदार धनंजय लचके, मंडळ अधिकारी महेश वाघ, शेजारी राम शिंदे, अशोक महाले आदी.
-------------
३६-३
टाकेदला प्रथमच जातीच्या दाखल्यांचे वाटप
एकशे अकरा नागरिकांना लाभ : कातकरी बांधवांनी मानले महसूल प्रशासनाचे आभार
सकाळ वृत्तसेवा
इगतपुरी, ता.१३ : टाकेद येथील कातकरी वस्तीतील नागरिकांना स्वातंत्र्यानंतर प्रथमच जातीचे प्रमाणपत्र मिळाल्याने कातकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अनेक वर्षांपासून जातीच्या दाखल्यांपासून वंचित कातकरी समाजातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच शैक्षणिक व सामाजिक प्रगतीसाठी जात प्रमाणपत्राची मोठी अडचण येत होती. ही समस्या लक्षात घेऊन राम शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. आवश्यक कागदपत्रे, पंचनामे प्रस्तावित करून त्यांच्या प्रयत्नांना महसूल प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने अखेर कातकरी बांधवांचे जात प्रमाणपत्र मिळण्याचे स्वप्न साकार झाले.
प्रांताधिकारी पवन दत्ता, तहसीलदार अभिजित बारावकर, नायब तहसीलदार धनंजय लचके यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. आबाजी बारे, अशोक महाले, राम शिंदे, मंडळ अधिकारी महेश वाघ यांचा टाकेद ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला. तलाठी निकित तरटे, गणेश वाजे, माजी सरपंच बाळासाहेब घोरपडे, पोलिस पाटील प्रभाकर गायकवाड, अशोक महाले, दिलीप बांबळे, रामनाथ जाधव यांनी सहकार्य केले.
---
कोट
सर्वांना जात प्रमाणपत्र मोफत घरात वीज मीटर, रेशनकार्ड, रस्ता, वीज पाणी यांसह घरकुल आदी सर्वच सुविधांचा लाभ मिळाला. सर्व अधिकाऱ्यांचे आम्ही ऋणी आहोत.
- दिलीप बांबळे, पार्वतीबाई पवार, ग्रामस्थ, टाकेद बु
--------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.