नाशिक

टाकळी फाटा खोद काम रामभरोसे

CD
फोटो : A14977 नाशिक : टाकळी फाटा परिसरात चेंबरच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेला खड्डा -- ‘त्या’ दुर्घटनेतून प्रशासनाने काय शिकले? टाकळी फाट्यावर खड्ड्यांमुळे जीव धोक्यात सकाळ वृत्तसेवा जुने नाशिक, ता. ९ : ड्रेनेज लाइनवर चेंबर बांधण्याचे काम टाकळी फाटा ते द्वारका परिसरात सुरू आहे. यासाठी खोल खड्डा केला असून, बॅरिकेटिंग व्यतिरिक्त अन्य कुठलीही सुरक्षा व्यवस्था नसल्याचे प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले. टाकळी फाटा ते द्वारका मार्गावर ड्रेनेज लाइनवर चेंबर बांधण्याचे काम शुक्रवारी (ता. ९) सुरुवात करण्यात आले. टाकळी फाटा येथे एक चेंबर बांधून दुसऱ्या चेंबरसाठी खोल खड्डा खोदला आहे. चेंबरचे काम झालेल्या भागात केवळ माती टाकून तो भाग बुजवला. दुसऱ्या चेंबरसाठी खड्डा खोदलेला खड्डा तसाच उघडा आहे. कर्मचाऱ्यांकडून खड्ड्याच्या भोवती बॅरिकेटिंग लावले आहे. असे असले तरी इतर सुरक्षा व्यवस्था मात्र दिसून आली नाही. सुरक्षारक्षक, बाउन्सर तर सोडा कर्मचारीदेखील रात्रीच्या वेळी आढळून आला नाही. रिफ्लेक्टर नसल्याने खड्ड्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनचालकांना खड्डा लक्षात आला नाही तर अपघात घडण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर काम सुरू असल्याचे फलकदेखील आढळून आले नाही. दोन दिवसांपूर्वी राजीवनगरमध्ये अशाच प्रकारच्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू झाला. तरीदेखील संबंधित विभागाकडून याची दक्षता घेण्यात आली नाही. पुन्हा त्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती यामुळे परिसरातील नागरिक आणि वाहनचालकांनी व्यक्त केली आहे. महापालिका आणि संबंधित ठेकेदारांनी अशा घटना घडू नये याची काळजी घेत सर्व प्रकारच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या उपाययोजना न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd T20I: विंडीजची ढापाढापी.. संजू सॅमसनची 'विराट' विक्रमाशी बरोबरी, कोहलीने २०१९ मध्ये केलेला असा पराक्रम...

Gangapur News : लग्नानंतर काठी नवऱ्याला मारू नकोस, नाना पाटेकरांच्या त्या मिश्किल प्रतिक्रियेची साक्षी शिरसाटला आठवण

Maharashtra Live News : निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत चिंता; 'इंडिया' आघाडीच्या खासदारांचा राष्ट्रपती भवनाकडे मोर्चा

NCP Expulsion : बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत पुरुषोत्तम जगताप यांच्यासह बंडखोरांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी; विद्यमान अध्यक्षांवर तडकाफडकी कारवाई

Indian Raiway Tickets: GNWL, RLWL, PQWL, TQWL! रेल्वे तिकिटावर दिसणारे हे कोड असतात तरी काय? जाणून घ्या त्यांचा अर्थ

SCROLL FOR NEXT