car in parking.jpg 
नाशिक

लॉकडाऊनमध्ये तुमची 'कार' एकाच जागी उभी?या टिप्स वाचा अन् चिंता करु नका!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोनाच्या या संकटामुळे सध्या नागरिकांना घरातच बसून राहण्यास सांगण्यात आले आहे. पोलिसांनीही वाहतूक बंदीची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळे सुमारे 8 ते 10 दिवसांपासून नागरिकांच्या कार जागेवरच उभ्या आहेत. कार जर एकाच जागेवर सुमारे 8 दिवसांपेक्षा जास्त काळ बंद अवस्थेत असेल तर तिची बॅटरी उतरण्याची शक्यता असते. परिणामी ती सुरू होऊ शकत नाही. त्यामुळे या टीप्सच्या मदतीने कारला चांगल्या स्थितीमध्ये ठेवा   

बॅटरी मेंटेनेंस
अनेक दिवसांपासून कार एकाच जागेवर पडून राहिल्यास बॅटरी डिस्चार्ज होऊ शकते. अशात आठवड्यातून एक-दोन वेळेस तुम्ही कारला सुरू करुन, 15-20 मिनीटांसाठी गरम होऊ द्या. यादरम्यान तुम्ही कारचे व्हायवर आणि लाइटदेखील तपासू शकता.

टायर प्रेशर
तुम्ही कार वापरा किंवा नका वापरू, गाडीची हवा कमी होते. अशात एकाच जागेवर कार थांबवल्याने तुमच्या कारचे टायर फ्लॅट स्पॉट होऊ शकतात. याचा परिणाम टायर ग्रिप, कारची राइड क्वालिटी आणि मायलेजवर पडू शकतो. अशात तुम्ही ठराविक दिवसानंतर कारचे टायर चेक करा.

हँड ब्रेक/पार्किंग ब्रेक
अनेक दिवसांसाठी कार एकाच जागी लावायची असेल, तर कारचे हँड ब्रेक लावून ठेवा. पण, अनेक दिवसांसाठी ब्रेक लावल्याने, दुसरे ब्रेक खराब होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही अधुन-मधून कार सुरू करा किंवा कारला गिअरमध्ये टाकून ठेवा. उतारावर गाडी लावली असेल तर चाकाखाली विट ठेवा.

ऑटो डेस्क-. भारतात 21 दिवसांसाठी लॉकडाउन लावला आहे, ज्यामुळे नागरिकांसोबतच त्यांच्या कारही घरात पडून आहेत. जर कार एकाच जागेवर अनेक दिवस पडून असेल, तर त्या कारला नंतर सुरू करण्यासाठी अडचणी येऊ शकतात. त्यामुळे एकाच जागेवर उभ्या असलेल्या कारची काळजी घेण्याची गरज आहे. या 5 बेसिक टिप्स फॉलो करुन तुम्ही तुमच्या कारला चांगल्या कंडीशनमध्ये ठेऊ शकता.

टायर प्रेशर
तुम्ही कार वापरा किंवा नका वापरू, गाडीची हवा कमी होते. अशात एकाच जागेवर कार थांबवल्याने तुमच्या कारचे टायर फ्लॅट स्पॉट होऊ शकतात. याचा परिणाम टायर ग्रिप, कारची राइड क्वालिटी आणि मायलेजवर पडू शकतो. अशात तुम्ही ठराविक दिवसानंतर कारचे टायर चेक करा.

एक्सटीरियरला स्वच्छ ठेवा
एकाच जागेवर अनेक दिवस कार थांबल्याने त्यावर धुळ आणि माती पडू शकते. अशात त्या कारला साफ ठेवण्यासाठी थोडा त्रास होऊ शकतो आणि त्यावर डाग पडू शकतात. त्यामुळे आठवड्यातून कमीत-कमी दोन वेळेस आपली कार स्वच्छ धुवा. तसेच, कारला इंडोरमध्ये ठेवून त्यावर कपडा झाका.

इंटीरिअरला स्वच्छ ठेवा
अनेक वेळा लोक आपल्या कारमध्ये अनेक सामना ठेवतात. तुम्हीदेखील कारमध्ये स्नॅक्स किंवा एखादे लिक्विड आयटम स्टोर करुन ठेवले असतील, तर ते काढून कारच्या मधील भाग स्वच्छ ठेवा. अनेक दिवसांसाठी कारमध्ये वस्तू ठेवल्याने, त्या खराब होऊ शकतात. कार स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही किटाणूनाशक स्प्रे करू शकता.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HARRY BROOK DOUBLE CENTURY: हॅरी ब्रूकचा वनडेत ऐतिहासिक धमाका! ११४ चेंडूंत द्विशतक ठोकत शुभमन गिलचा विक्रम मोडला, इंग्लंडसाठीही रचला इतिहास

ED Raid : पुण्यासह मुंबईतील ५६७ कोटींची मालमत्ता ‘ईडी’कडून जप्त; ‘पीएसीएल’ गैरव्यवहारप्रकरणी प्रतीक कुमारसह कंपन्यांविरोधात कारवाई

Latest Marathi News Live Update : पहिल्या टी-२० सामन्यात भारताकडून न्यूझीलंड गारद

अखेर बाप- लेकीची भेट होणार! कमळीला राजनच आपले वडील असल्याचं सत्य समजणार; 'कमळी' मध्ये मोठा ट्विस्ट, कामिनी तोंडावर पडणार

Katraj Dairy Milk Rate : कात्रज डेअरीकडून दूध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपयाची वाढ

SCROLL FOR NEXT