Ongoing work of laying rainwater and drainage pipelines in Talakuteshwar river basin
Ongoing work of laying rainwater and drainage pipelines in Talakuteshwar river basin esakal
नाशिक

Nashik News : टाळकुटेश्वर नदीपात्रास मिळणार पुनर्वैभव! ड्रेनेज पाइपलाइन टाकण्याचे काम प्रगतिपथावर

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : टाळकुटेश्वर नदीपात्रात पावसाळी गटार तसेच ड्रेनेजलाइन टाकण्याचे काम प्रगतिपथावर सुरू आहे. नदी प्रदूषणाचा गंभीर प्रश्न यामुळे सुटण्यास मदत होणार आहे.

या दोन्ही पाईपलाईनमधून सांडपाणी थेट मलजल शुद्धीकरण केंद्रात पोचणार असल्याने नदी प्रदूषण थांबण्यास मदत होणार आहे. (Talakuteshwar river basin will get reglory Drainage pipeline laying work in progress Nashik News)

गोदावरी नदीपात्र लगत असलेल्या गटारी, नाल्यांचे पाणी नदीपात्रात मिसळत होते. पावसाळ्यात हे प्रमाण अधिक असते. यामुळे नदी प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ होते. पवित्र गोदावरीचे पाणी काळवंडते. पर्यटकांमध्ये नाराजी दिसून येते.

नदीचे प्रदूषण दूर होऊन पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे, यासाठी महापालिकेकडून विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून नदीपात्रालगत असलेल्या गटारी आणि नाल्यांचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी नदीपात्रात मिसळू नये, यासाठी पात्रास लागून नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे.

दोन विविध प्रकारच्या पाइपलाइन टाकण्यात येत आहे. पावसाळी गटारीचे पाण्यासाठी तसेच गटारी आणि नाले यांच्या दुर्गंधीयुक्त सांडपाण्यासाठी स्वतंत्र पाइपलाइन जोडणी या माध्यमातून केली जात आहे. कपालेश्वर मंदिरापासून ते गाडगे महाराज पुलापर्यंत पाइपलाइनचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सध्या टाळकुटेश्वर नदीपात्रात पाइपलाइन टाकण्याचे काम प्रगतिपथावर सुरू आहे. नदीपात्रास लागून असलेल्या भागावर करण्यात आलेले काँक्रिटीकरण खोदून त्यात दोन्ही पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. नदीपात्रालगत येणाऱ्या ड्रेनेज आणि नाल्यांच्या पाइपलाइन या नवीन पाइपलाइनला जोडण्यात येणार आहे.

पूर्वी ड्रेनेज आणि नाल्यांचे पाणी थेट नदीपात्रात मिसळत होते. त्यामुळे नदीचे प्रदूषण होऊन दुर्गंधीत वाढ होत होती. नवीन पाइपलाइनमुळे दुर्गंधीयुक्त पाणी थेट मलजल शुद्धीकरण केंद्रात पोचणार असल्याने नदीचे प्रदूषण थांबणार आहे.

महिनाभरात टाळकुटेश्वर नदीपात्रालगतचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती ठेकेदारांकडून देण्यात आली. टाळकुटेश्वर नदीपात्राची वर्षानुवर्षे होणारी दुरवस्था यामुळे टळण्यास मदत होणार आहे. संपूर्ण पाइपलाइनचे काम पूर्ण झाल्यास नदीपात्रात पुन्हा पूर्वीप्रमाणे शुद्ध पाण्याचा प्रवाह बघण्याची संधी नाशिककरांसह पर्यटकांना मिळणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT