Nashik Municipal Corporation sakal
नाशिक

नाशिक : टीडीकेचा ऑक्सिजन प्लान्ट मनपाकडे

प्रकल्पाचे उद्‌घाटन महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या हस्ते

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोना तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी अंबड कोविड सेंटरमध्ये टीडीके कंपनीकडून उभारलेला ऑक्सिजन प्लान्ट गुरुवारी (ता.९) महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला. प्रकल्पाचे उद्‌घाटन महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या हस्ते झाले. कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी महापालिकेला आवश्‍यक असलेल्या वस्तूचा पुरवठा करण्याचे आवाहन आयुक्तांनी या वेळी केले.

कोरोना पहिल्या व दुसऱ्या लाटेचा सामना महापालिकेने यशस्वीरीत्या केला आहे. दुसऱ्या लाटेमध्ये मोठा अनुभव आल्याने त्या दृष्टीने तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी महापालिकेने तयारी सुरू केली आहे. तिसऱ्या लाटेची तयारी करताना कंपन्यांची मदत घेतली जात आहे. उद्योजकांच्या आयमा संस्थेकडून अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये पाचशे खाटांचे रुग्णालय सामाजिक दायित्वाच्या निधीतून सुरू करण्यात आले आहे.

या रुग्णालयामध्ये हवेतून ऑक्सिजन तयार करणारा प्रकल्प टीडीके कंपनीमार्फत सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शंभर खाटांना ऑक्सिजन पुरविला जाणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्याने महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला. कार्यक्रमास टीडीके कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हरिशंकर बॅनर्जी व बी. एस. रे, बॉश कंपनीचे विजय भट, नाशिक रनचे अशोक कासार, अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे, कोविड सेंटर मुख्य समन्वयक व आयमाचे धनंजय बेळे, एमआयडीसीचे विभागीय अधिकारी नितीन गवळी, आयमा उपाध्यक्ष निखिल पांचाळ, माजी अध्यक्ष राजेंद्र अहिरे, शहर अभियंता नितीन वंजारी, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत शेटे, बायोमेडिकल इंजिनिअर ऐश्वर्या म्हात्रे- कुलकर्णी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiroli Assault Case Update : शिरोली अत्याचारप्रकरणाला नवं वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यास रिव्हॉल्व्हर दाखवून धमकी दिल्याचा प्रकार; हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक

मानखुर्दमध्ये अपघातग्रस्त यंत्र हटवण्यासाठी रस्ता अडवला, १५ मिनिटांच्या अंतरासाठी ६ तास; दिवसभर वाहतूक कोंडी

'लग्नाआधी गर्भवती राहिले ते बरं झालं' अभिनेत्री नेहा धुपिया खुलासा करत म्हणाली...'मी देवाचे आभार मानते की...'

Virar Crime: आई नाही म्हणतेय! प्रेयसीचा लग्नाला नकार; प्रियकराने प्रेयसीसह आईची हत्या केली, स्वत:लाही संपवण्याचा प्रयत्न

IPL 2026, GT vs RCB: बंगळूर-गुजरात आज लढणार; अहमदाबादमध्ये 'काँटे की टक्कर'; कशी असेल प्लेइंग इलेव्हन

SCROLL FOR NEXT