पान एक
-------------------
05206
सुनील पिंपळे
सणानिमित्त सासूरवाडीला आलेले जावई बेपत्ता;
बागलाण तालुक्यातील घटना; माहिती देण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
अंबासन, ता. १३ : दिवाळीचा सण म्हणजे आनंद, उत्साह आणि नातेवाइकांच्या भेटीगाठींचा काळ. मात्र, याच सणाच्या निमित्ताने सासुरवाडीला आलेल्या शिक्षक जावई अचानक बेपत्ता होण्याची घटना बोढरी (ता. बागलाण) येथे घडली आहे. सुनील रामराव पिंपळे (वय ४०, रा. कोपरगाव, जि. अहिल्यानगर) असे बेपत्ता झालेल्या जावयाचे नाव आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या करंजी येथील शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत सुनील पिंगळे हे गुरूवारी (ता.१२) सासुरवाडीत आल्यानंतर सायंकाळी सहाला नेहमीप्रमाणे फेरफटका जात असल्याचे सासरे संतोष सोनवणे यांना सांगितले. नेहमीप्रमाणे वेळात परत येतील, असे कुटुंबीयांना वाटले. मात्र, बराच वेळ उलटूनही ते घरी न परतल्याने पत्नीने त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी पाच मिनिटांत येतो असे सांगितले. त्यानंतरही अर्धा तास उलटून गेला परंतु पिंपळे घरी पोहोचले नाहीत. पत्नीने पुन्हा मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल स्विच ऑफ असल्याचे आढळून आले. जावई रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने नातेवाइकांनी रात्रभर शोधाशोध केली. बोढरी गावालगत मोठ्या प्रमाणात जंगल परीसर आहे. रात्रीच्या वेळी नातेवाइकांनी जंगल परिसर पिंजून काढला. मात्र, सर्व प्रयत्न करूनही सुनील पिंपळे यांचा काहीच मागमूस लागला नाही. अखेर जायखेडा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन
बेपत्ता सुनील पिंपळे यांच्याबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास अथवा ते कुठे आढळून आल्यास त्वरित जायखेडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.