SATANA liguor truck acc.jpg
SATANA liguor truck acc.jpg 
नाशिक

जेव्हा भररस्त्यात पलटला दारुचा ट्रक आणि शौकिनांचे चमकले डोळे! पाहा VIDEO

रोशन खैरनार

सटाणा (नाशिक) : लॉकडाऊनमध्ये मद्याची दुकाने बंद असल्याने अनेकांचे वांदे झाले. मद्यासाठी वाटेल ते करणारे काही शौकिन तर गुन्हेगारीच्या वाटेवरही गेले. अशातच त्यांच्यासमोर चक्क दारूचा ट्रकच पलटला. काय घडले तेव्हा..एकदा पाहाच 

साक्षात विखुरलेल्या मद्यामुळे शौकिनांची दिवाळीच! 

गुरुवारी (ता. २९) रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास नामपुर व ताहराबाद (ता.बागलाण) देशी दारू घेऊन टेम्पो (क्र.एम.एच.१५ एजी ५८८६) घेऊन जात होता. शहरानजीक साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील मोरेनगर (ता.बागलाण) गावाजवळ महावितरणच्या सबस्टेशन येताच टेम्पोच्या डाव्या बाजूचे मागचे टायर अचानक फुटले. टेम्पो जागीच पलटी झाला. टायर फुटल्याच्या आवाजाने परिसरातील नागरिकांनी तत्काळ महामार्गावर धाव घेतली. यावेळी पलटी झालेल्या टेम्पोतून दारूचे खोके रस्त्यावर पडून काचेच्या बाटल्या फुटल्याने महामार्गावर काचेचा खचही पडला होता. दारू पडल्याने परिसरात सर्वत्र दारूचा दर्पही पसरला होता. अपघाताचे वृत्त वार्‍यासारखे पसरताच परिसरातील मद्य शौकिनांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अनेकांनी दारूच्या बाटल्या लांबवल्या. टेम्पो उलटल्याने राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक दुतर्फा ठप्प झाली होऊन लांबच लांब रांगा लागल्या होत्या. 

ड्रायव्हरसह इतर चार जण गंभीर जखमी 

सामाजिक कार्यकर्ते परशुराम पाकळे, पिंपळदरचे सरपंच संदीप पवार, बाळा देवरे आणि महावितरणच्या कर्मचार्‍यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने दारूच्या बाटल्यांच्या खोक्याखाली अडकलेल्या वाहनचालक व कामगारांना बाहेर काढले. तत्काळ सटाणा ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी हलवले. या अपघातात शुभम रवी नायर (वय २६, नाशिक) याच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. चेहर्‍यास दारूच्या बाटल्यांचे काच लागून गंभीर जखमा झाल्या आहेत. तर चालक फकिरा बळवंत बर्वे (वय ५०), संजय नामदेव डांबेकर (वय ५२), देवीदास श्रीधर भालेराव (वय २८), आनंद शंकर पगारे (सर्व रा.नाशिक) हे किरकोळ जखमी झाले आहेत. 

अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक देवेंद्र शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल पुंडलिक डंबाळे, अजय महाजन, योगेश गुंजाळ, विलास मोरे यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. गर्दी पांगवली आणि पलटी झालेला टेम्पो सरळ करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. सटाणा पालिकेचा अग्निशमन बंबाद्वारे दत्तू नंदाळे व भूषण सोनवणे यांनी अपघातस्थळी पाडलेल्या काचेचा खच दूर करण्यास मदत केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT