corona test 12.jpg
corona test 12.jpg 
नाशिक

धक्कादायक! मजुरांना सोडायला युपीला गेला..अन् परतीच्या प्रवासात मृत्यू घेऊन आला

सकाळ वृत्तसेवा

ठाण्यातील चालकाचा कोरोनामुळे सिव्हिलमध्ये मृत्यु

नाशिक : ठाण्यात राहणारे वाहनचालक कामगारांना उत्तर प्रदेशात पोहोच करण्यासाठी चारचाकी वाहनाने गेले होते. परतीच्या प्रवासादरम्यान त्यांच्या कारला अपघात झाला. त्यानंतर ते परतीचा प्रवास करीत असताना गेल्या 18 तारखेला चांदवडमध्ये आले असता त्यांना ताप, खोकला आणि श्‍वसनाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना चांदवड येथील कोविड हेल्थ सेंटरमध्ये तपासणीसाठी दाखल करण्यात आले.आणि तिथेच घात झाला..

असा झाला वाहनचालकाचा घात

ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात राहणारे 54 वर्षीय चालक असून, कामगारांना उत्तर प्रदेशात पोहोच करण्यासाठी चारचाकी वाहनाने गेले होते. परतीच्या प्रवासादरम्यान त्यांच्या कारला अपघात झाला. त्यानंतर ते परतीचा प्रवास करीत असताना गेल्या (ता.18) तारखेला चांदवडमध्ये आले असता त्यांना ताप, खोकला आणि श्‍वसनाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना चांदवड येथील कोविड हेल्थ सेंटरमध्ये तपासणीसाठी दाखल करण्यात आले. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेतल्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या (ता.19) तारखेला त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. तर उपचारादरम्यान त्यांना न्युमोनियाचा त्रास वाढला. अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर त्यांना ठेवण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती खालावत गेल्याने सोमवारी (ता. 25) रात्री त्यांचा मृत्यु झाला आहे.

परतीच्या प्रवासात कोरोनाची लागण

ठाण्यातून खासगी वाहनाने कामगारांना उत्तरप्रदेशात पोहोच करण्यासाठी गेलेला चालक कोरोनाबाधित झाला. त्याच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी (ता. 25) रात्री मृत्यु झाला. गेल्या 18 तारखेला परतीच्या प्रवासादरम्यान चालकास कोरोनाची लागण झाली होती. 

मृतांचा आकडा 55

जिल्ह्यात कोरोनामुळे मृत झालेल्यांचा आकडा 55 झाला आहे. तर, परजिल्ह्यातील हे दुसरे बळी आहेत. तीन दिवसांपूर्वी निमोण (ता. संगमनेर) येथील 63 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT