कचऱ्यातून मिळालेली रक्कम गेली दंडात sakal
नाशिक

कचऱ्यातून मिळालेली रक्कम गेली दंडात

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक :कचरा विक्रीतून मिळालेली रक्कम दंडात भरण्याची वेळ दीप मेडिकलच्या मालकांवर आली. कचऱ्याचा योग्य विल्हेवाट लावला असता तर कदाचित त्यांना कारवाईला सामोरे जावे लागले नसते.

दीप मेडिकल यांच्याकडून दुकानाच्या साफसफाई औषधाची पॅकिंग होणारी थर्माकोल त्याचप्रमाणे अन्य विविध प्रकारचा कचरा निघाला. त्यांनी तो कचरा एका व्यक्तीस अकरा हजार रुपये विक्री केला. त्या व्यक्तीने कचऱ्यातून त्यास आवश्यक असलेल्या वस्तू घेतल्यानंतर तो संपूर्ण कचरा जनरल वैद्यनगर भागातील मोकळ्या भूखंडावर फेकून दिला. सार्वजनिक ठिकाणी, तसेच मोकळ्या मैदानावर कचरा करण्यास बंदी असताना इतक्या मोठ्या प्रमाणावर तोही प्रदूषित कचरा पडून असल्याचे पूर्व विभागाचे विभागीय स्वच्छता निरीक्षक सुनील शिरसाट आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी घटनास्थळी जाऊन कचऱ्याची पाहणी केली. त्यात त्यांना दीप मेडिकल नावाने काही पावत्या सापडल्या.

त्यावरून त्यांनी गोळे कॉलनी येथील दीप मेडिकल चालकांशी संपर्क करत घडलेला प्रकार सांगितला. त्यांनीदेखील आपण दुकानातील कचरा विकला असल्याचे सांगून मिळून आलेला कचरा त्यांचाच असल्याचे स्पष्ट केले. श्री. शिरसाट आणि त्यांच्या पथकाकडून मेडिकल चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. उघड्यावर कचरा टाकला प्रकरणी दहा हजाराचा दंड करण्यात आला. मेडिकल चालकांनी त्यांच्या दुकानातील निघालेला कचरा अकरा हजारात विकला. कचऱ्याची चांगली रक्कम आल्याने त्यांनाही समाधान वाटले असावे, परंतु त्यांचे ते समाधान क्षणभंगुर राहिले. कचरा विक्री केलेल्या व्यक्तीने तो कचरा उघड्यावर टाकल्याने त्याचा मनस्ताप मेडिकल चालकांना सहन करावा लागला. कचरा मेडिकलचा असल्याने महापालिकेकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करत दहा हजाराचा दंड केल्याने कचऱ्यातून मिळालेली रक्कम दंडात भरावी लागली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Attack: स्फोटकांनी भरलेली गाडी धडकली अन्...; पाकिस्तानात भीषण आत्मघाती हल्ला! १२ सैनिकांसह १५ जणांचा मृत्यू

Pilgrim Saved: पंढरपूर वारीत हृदयविकाराचा झटका; मुख्यमंत्र्यांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे वारकऱ्याचे प्राण वाचले

NEET Protest Pune: नीट पेपरफुटीविरोधात पुण्यात ‘जेन झी’ची तिरंगा पदयात्रा; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची गर्जना

Dharmendra Pradhan Resignation: धमेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात जेन-झीचा विराट एल्गार, पावसाला-धमक्यांना न जुमानता तरुणाई रस्त्यावर

Tribal Voters at Risk: कागदपत्रांच्या अडचणींमुळे आदिवासी मतदार वंचित होण्याचा धोका; मनसे तालुकाध्यक्ष सुनील साठे यांची प्रशासनाकडे सहकार्याची मागणी

SCROLL FOR NEXT