Death
Death esakal
नाशिक

होतकरु नाट्यकलावंत प्रतीक गुंजाळचे निधन

सकाळ वृत्तसेवा


नाशिक : येथील होतकरु नाट्य कलावंत यांचे प्रतीक गुंजाळ (वय, २१) याचे ह्रदयविकाराने रविवारी (ता. ०५) निधन झाले.

कृपा शैक्षणिक सामाजिक बहूउद्देशीय संस्थेमार्फत प्रतीकने आपल्या नाट्यक्षेत्रातील प्रवासाला सुरुवात केली होती. नाटकांमध्ये संगीत, प्रकाश योजना सोबत नेपथ्य यामध्ये प्रतीकचा हातखंडा होता. ‘देवाच दान’ ह्या राज्यनाट्य स्पर्धेतील नाटकासाठी त्याला उत्कृष्ट नेपथ्याच पारितोषिक मिळालं होत. देहासक्त, देवाच दान, तिनचोक तेरा, संगीत वात्सल्य, नजर, मंजुळा, यंत्रधिकार, सपान, कष्टाचा रुपया, लेट्स बिगीन, ड्राइव्हर, तीन शहाणे, बापू एक खोज, मारायला गेलो एक, माझ्या बायकोच्या नवऱ्याच्या बायकोचा खून अशा अनेक नाटकात त्याने भूमिका साकारल्या. नाटकात स्टेजवर काम करत असताना बॅक स्टेजची जबाबदारीही त्याने सांभाळली.

तासाचं दृष्टिकोन, सावली, सपान, द वे आऊट, नवी आशा, उमग, ह्या लघुपटांमध्ये त्याने काम केले आहे. यासोबतच यांगराड आणि काळीमाती या चित्रपटांही त्याने काम केले आहे. काळीमाती चित्रपटासाठी त्याला अमेरिकाचा उत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार जाहीर झाला होता. आदिवासी पाड्यांवर कपडे वाटप, गोदाघाटावर अन्न वाटप यांसह अनेक समाजिक उपक्रमात त्याचा सहभाग असायचा. कौटुंबिक जबाबदारी खांद्यावर असल्याने उदरनिर्वाहासाठी तो फोटोग्राफीचा व्यवसाय करत असे. अशा होतकरु कलावंताच्या निधनाने नाशिकच्या नाट्यक्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्‍चात आई- वडिल आणि बहिण असा परिवार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 74,005 वर, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: किर्गिस्तानमध्ये हिंसाचार चार पाकिस्तानी विद्यार्थी ठार; भारतीय विद्यार्थीही ठरले लक्ष्य

Online Vegetable Shopping : Blinkit भाजी खरेदीवर फ्री कोथिंबीर घेण्यास नकार! नेटकऱ्यांनी केली 'ही' मागणी

शरद पवारांना धक्का! 'या' नेत्याची 'राष्ट्रवादी'ला सोडचिठ्ठी; शिंदे म्हणाले, हातातोंडाशी आलेल्या मुलानं कायमस्वरूपी..

SCROLL FOR NEXT