thief arrested for withdrawing money by exchanging ATM nashik news esakal
नाशिक

Nashik | एटीएमची अदलाबदली करून पैसे काढणाऱ्या सराईतास अटक

प्रतीक जोशी

नाशिक : एटीएमची (ATM) अदलाबदली करून खात्यातून परस्पर पैसे काढणाऱ्या संशयितास मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी निलंगा (जि. लातूर) येथून अटक केली. शैलेश शिंदगे (२२, रा. सातपूर), असे संशयिताचे नाव आहे. ७ मे २०२१ रोजी आडगाव येथील माजी सैनिक लहानू ठोंबरे हे पैसे टाकण्यासाठी बोधलेनगर येथील भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) सीडीएम (CDM) आणि एटीएम हे एकाच ठिकाणी असलेल्या शाखेत गेले होते.

त्यांना सीडीएम मशिनमध्ये पैसे टाकण्यास अडचण येत असल्याने त्यांच्यामागे उभ्या असलेल्या संशयित शैलेश यांनी ठोंबरे यांना सीडीएममध्ये पैसे टाकून दिले. त्यानंतर हे पैसे बँक खात्यावर जमा झाले की नाही याची खात्री करण्यासाठी त्यांच्याकडील एटीएएम कार्ड व पीन नंबर मागवून घेतला. त्यानंतर शैलेश याने एटीएमची अदलाबदल केली. यानंतर त्याने ठोंबरे यांच्या खात्यातून वीस हजार रुपये काढून घेतले. फसवणूक झाल्याचे कळताच त्यांनी मुंबई नाका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

मुंबई नाका पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक के. टी. रोंदळे यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास केला. गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार संशयित शैलेश शिंदगे हा लातूर (Latur) जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील लोंढेनगर येथील मॉडर्न इंग्लिश स्कूल येथे असल्याचे सांगितले. त्यानंतर पथकाने थेट निलंगा गाठत संशयित शैलेश यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपूस केली असता, त्याने यापूर्वीदेखील नाशिक (३), जालना (३), परभणी, नांदेड, ठाणे आणि मुंबई येथे अशा प्रकारचे गुन्हा केल्याची कबुली दिली. संशयित शैलेश यास न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कामगिरी सहाय्यक निरीक्षक के. टी. रोंदळे, रोहिदास सोनार, अनिल आव्हाड, अप्पा पानवळ यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM 3rd T20I: भारतीय संघाने टॉस जिंकला; दोन बदलांसह मैदानावर उतरला, वाचा कोणाला मिळालीय Playing XI मध्ये जागा

Rupali Dhamdhere PhD : तळेगाव ढमढेरेच्या रूपाली ढमढेरे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. पदवी जाहीर

सलग दोन सुपरहिट हॉरर पट अन् पहिलं सिनेमॅटिक युनिव्हर्स; दिग्दर्शक प्रीतम पाटील यांची बॉक्स ऑफिसवर हवा!

IND vs ZIM 3rd T20I: अभिषेक शर्मा OUT, ४ खेळाडू IN? तिसऱ्या ट्वेंटी-२० साठी कशी असेल भारताची Playing XI? प्रिन्स यादव जखमी...

'सनई चौघडे' आणि 'हास्यजत्रा'नंतर निमिष कुलकर्णीची मोठी झेप; 'द्विधा'तून मोठ्या पडद्यावर एन्ट्री

SCROLL FOR NEXT