theft.png 
नाशिक

जेव्हा मध्यरात्री गन हाऊसमध्ये चोरट्यांची होते एंट्री...अन् मग

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : (आडगाव) येथील गन हाऊसच्या शॉपचे शटर उचकटून चोरट्यांनी एअर पिस्टल, एअर रायफल, स्टेनगनसह छऱ्यांचे बॉक्‍स असा सव्वा लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

असा आहे प्रकार

भाऊसाहेब नरहरी बेलेकर (रा. मांडसांगवी, औरंगाबादरोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे नांदूरनाका जेलरोड येथे अथर्व गन हाऊस स्पोर्टस्‌ या नावाचे दुकान आहे. गेल्या मंगळवारी (ता. 23) मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या बंद दुकानाचे शटर अज्ञात चोरट्यांनी उचकटावून आत प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी दुकानातील 85 हजार रुपयांच्या 24 एअर पिस्टल,7 हजार 500 रुपयांच्या तीन स्टेनगन, 24 हजार रुपयांच्या चार एअर रायफल आणि या बंदूकांसाठी लागणाऱ्या छऱ्यांचे 5 बॉक्‍स असा एक लाख 21 हजार 500 रुपयांचे साहित्य चोरट्यांनी चोरून नेले. 

सदरची बाब भाऊसाहेब बेलेकर हे बुधवारी (ता. 24) सकाळी दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर उघडकीस आली. याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक धैर्यशील घाडगे करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याचे भाव कोसळले; महिन्याभरात 23,000 रुपयांनी स्वस्त आणि आज तर तब्बल... खरेदीआधी जाणून घ्या ताजा भाव

Amit Shah Kolhapur Visit : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रात्री कोल्हापुरात दाखल होणार; अंबाबाई मंदिराबाबत मोठा निर्णय, पाहा मिनिट-टू-मिनिट कार्यक्रम

Latest Marathi News Live Update : पंढरपूर कॉरिडॉरच्या कामाला प्रशासकीय मान्यता; 3 993 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद

Mumbai BEST Bus Strike : मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप; रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट, प्रवाशांमध्ये संताप

Lote MIDC Water Crisis : कोकणातील उद्योगांवर 40 वर्षांत प्रथमच मोठं संकट! 15 जूनपासून एमआयडीसीचे पंपिंग स्टेशन बंद; पुढील दोन दिवसांत सर्व कंपन्या कुलूप लावणार

SCROLL FOR NEXT