daughter and father
daughter and father esakal
नाशिक

वडिलांचा दफनविधी उरकताच लेकीनेही सोडला प्राण

प्रमोद सावंत

मालेगाव (जि.नाशिक) : मुंबई-आग्रा महामार्गावरील (mumbai-agra highway) दोन वेगवेगळ्या अपघातांत बाप-लेक दोघेही ठार झाले. यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. शुक्रवारी (ता. ४) सकाळी साडेसहा व साडेसातच्या सुमारास एकाच ठिकाणी हे दोन अपघात झाले. (Three-killed-Accident-malegaon-marathi-news)

वडिलांचा दफनविधी उरकताच लेकीनेही सोडला प्राण

म्हाळदे शिवारातील हाजी मोहंमद अब्बास मशिदीचे मौलाना सुफियान अहमद मोहंमद शाबान (वय ३३, रा. गुलशने मालिक) दोघा मुलींसह नमाज पढवून दुचाकीने (एमएच- ४१- एएस- ४६३९) घराकडे परतत होते. फाट्याजवळ रस्ता ओलांडण्यासाठी दुचाकी थांबलेली असतानाच भरधाव आलेल्या आयशर ट्रकने (जीजे-१५-एव्ही-२२९८) ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत दुचाकीला जबर धडक दिली. सकाळी साडेसहाला हा अपघात झाला. यात सुफियान अहमद जागीच ठार झाले. तर त्यांच्या मुली गंभीर जखमी झाल्या. सुफियान अहमदचा दफनविधी उरकून कुटुंबीय व नातेवाईक घरी परतत असताना सुफियान अहमद यांची मुलगी जवेरिया (ता.९) हिचा खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

दुसरी घटना...

शहराजवळील सवंदगाव फाट्याजवळ झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन आयशर ट्रकने दोन दुचाकींना धडक दिल्याने बापलेकीसह एक महिला असे तिघे ठार झाले. मुलगी व तरुणासह दोघे जखमी झाले. दुसऱ्या मुलीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पवारवाडी पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला. दुसरी घटना वंदगाव फाट्यावरच सकाळी साडेसातला घडली. दुचाकीला (एमएच- ४१-एक्यू-४०२७) भरधाव आयशर ट्रकने धडक दिल्याने दुचाकीच्या पाठीमागे बसलेल्या उज्ज्वला संतोष बोराळे (४१, रा. बोराळे, ता. नांदगाव) जागीच ठार झाल्या. दुचाकीस्वार त्यांचा मुलगा जयदीप (२१) जखमी झाला. संतोष बोराळे यांच्या तक्रारीवरून पवारवाडी पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT