Accident News sakal
नाशिक

Nashik Accident News: मालेगाव तालुक्यातील 2 अपघातांत तिघांचा मृत्यू; मृतांमध्ये मायलेकाचा समावेश

सकाळ वृत्तसेवा

Nashik Accident News : मालेगाव तालुक्यात येसगाव शिवार व निळगव्हाण फाटा या दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला.

येसगाव शिवारात पिक-अपने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये मायलेकाचा समावेश आहे. (Three killed in 2 accidents in Malegaon taluka few dead Nashik Accident News)

चंदनपुरी-मळगाव रस्त्यावरील चांभार वस्तीजवळ येसगाव शिवारात भरधाव जितो पिक-अपने (एमएच ०६ बीजी ३८९६) येसगावकडून मालेगावकडे येत असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला (एमएच ४१ बीजी ६६२२) जबर धडक दिली.

यात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. दुचाकीस्वार संदीप दीपक रावळे हा आई निर्मला मधुकर रावळे (दोघे रा. येसगाव) यांच्यासह येसगावकडे जात असताना हा अपघात झाला. यात मायलेकाचा मृत्यू झाला.

दैव बलवत्तर म्हणून दुचाकीवरील निर्मला रावळे यांचा नातू कृष्णा सचिन चव्हाण सुदैवाने बचावला. तो गंभीर जखमी असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संदीप व निर्मला यांना जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

मंगळवारी (ता. ५) हा प्रकार घडला. दीपक रावळे यांच्या तक्रारीवरून पिक-अप चालकाविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा व अपघाताचा गुन्हा दाखल झाला. अपघातानंतर पिक-अपचालक फरारी आहे. सहाय्यक निरीक्षक प्रीती सावंजी तपास करीत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मालेगाव-नामपूर रस्त्यावरील निळगव्हाण (ता. मालेगाव) शिवारात दुसरा अपघात झाला. निळगव्हाण फाट्यावर दुचाकी घसरून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.

पुरुषोत्तम भिवसन गोलाईत (वय ५५, रा. लोणवाडे, ता. मालेगाव) निळगव्हाणहून वजीरखेडेकडे दुचाकीने (एमएच ४१ बीजी २४१५) भरधाव जात असताना दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी रस्त्याच्या नालीत घसरून खाली पडली.

या अपघातात पुरुषोत्तम यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी (ता. ६) हा अपघात झाला. पोलिस नाईक मनोज बाचकर यांच्या तक्रारीवरून वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात पुरुषोत्तम गोलाईत यांच्याविरुद्ध स्वत:च्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: महापरिनिर्वाण दिनासाठी रेल्वेची मोठी तयारी! ४ ते ८ डिसेंबरदरम्यान विशेष गाड्या धावणार, जाणून घ्या वेळापत्रक...

Hinjewadi IT Park bus accident : पुण्यातील हिंजवडी IT पार्कमध्ये भीषण अपघात; भरधाव बस फूटपाथवर चढली अन् दोन भावंडाना चिरडलं!

Mumbai News: नवी मुंबईकरांनो लक्ष द्या!सीवूड्स-दारावे स्थानकाचे नाव बदलले; रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय, कारण काय?

नवऱ्या-नवरीची बुलेटवरून एंट्री अन् सुनेला हळद लावणाऱ्या कूल सासूबाईं; पाहा बांदेकरांच्या हळदीचे Inside Photos

Pune Crime : नशेच्या गोळ्यांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; शहरात मोठ्या प्रमाणावर विक्री; सात हजार नशेच्या गोळ्या जप्त!

SCROLL FOR NEXT