नाशिक

बातमीचा परिणाम -जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेशासाठी जिल्हास्तरावर १२कोटी १४ लाख ९०हजार अनुदान प्राप्त

CD
०४०८५ बातमीचे कटआऊट ------------ सकाळ इम्पॅक्ट लोगो घेणे ---------- विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी १२ कोटी १४ लाखांचे अनुदान जिल्हा परिषदेच्या १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार दोन्ही गणवेश; सकाळ वृतसेवा जुनी शेमळी, ता. १७ : शैक्षणिक वर्ष सुरू होऊन तीन महिने उलटूनही जिल्हा परिषद शाळांमधील पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना पहिल्या व दुसऱ्या गणवेशासाठी शासनाकडून अनुदान प्राप्त झाले नव्हते. यामुळे शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या समस्येबाबतचे ‘सकाळ''मध्ये १३ सप्टेंबरला प्रसिद्ध होताच, प्रशासनाने त्यादोन गणवेशासाठी जिल्हास्तरावर १२ कोटी १४ लाख ९० हजार रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. जिल्हा परिषद शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच गणवेश उपलब्ध होणे अपेक्षित असते. मात्र, तीन महिने उलटूनही अनुदान न मिळाल्याने शिक्षकांसमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. विद्यार्थ्यांना दुसरा गणवेश कधी मिळणार, याबाबत पालक व विद्यार्थ्यांकडून सातत्याने विचारणा होत होती.''सकाळ''ने या समस्येकडे लक्ष वेधल्यानंतर शासनाकडून प्रति विद्यार्थी ६०० रुपये प्रमाणे (दोन गणवेशासाठी) निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे आता विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता असून, प्रशासनाने हे अनुदान तातडीने वितरित करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तालुकास्तरीय गणवेश अनुदान सुरगाणा ८,५९,००,८०० मालेगाव १,२८,०७,६०० दिंडोरी १,२६,२६,४०० इगतपुरी १,०३,००,८०० निफाड १,००,३०,८०० बागलाण ९३,९४,८०० नांदगाव ८०,०९,४०० त्र्यंबकेश्व ७४,२३,८०० कळवण ७०,९४,४०० सिन्नर ६८,६१,४०० पेठ ६५,४१,२०० नाशिक ६४,९६,८०० येवला ६२,७०,६०० चांदवड ५६,१८,४०० देवळा ३४,१४,६०० ०४०८६ या वर्षी गणवेश अनुदान उपलब्ध नसतानाही मुख्याध्यापकांनी स्व-नियोजनाने विद्यार्थ्यांना एक गणवेश उपलब्ध करून दिला होता. शाळांच्या खात्यावर हे अनुदान प्राप्त झाल्यास दुसरा गणवेश खरेदी करता येईल. - संजय शेवाळे, जिल्हाध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS AFG 3RD T20I: २० चेंडूंत १०२ धावा... Abhishek Sharma ने ट्वेंटी-२०चा इतिहास-भूगोल बदलला! एक नव्हे अनेक विक्रम मोडले, सेलिब्रेशन तर भारीच केले Video Viral

Tarapur Leopard Scare: तारापूर-चिंचणी परिसरात बिबट्याला गुरांचा चोप; नागरिकांमध्ये भीती, वनविभागाकडे जेरबंदाची मागणी

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माने इतिहास रचला; ट्वेंटी-२०तील सर्वात वेगवान शतक!मोडला रोहित शर्माचा विक्रम, विराटशी बरोबरी

Pune Ganeshotsav Traffic : पुण्यात गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीत मोठा बदल; 18 ते 25 सप्टेंबरदरम्यान 'हे' प्रमुख रस्ते राहणार बंद, जाणून घ्या महत्त्वाचे पर्यायी मार्ग

Gangapur Sugar Mill: गंगापूर सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त करण्याचा निर्धार; जय हिंदने गाळप केलेल्या ऊसाचे बिल १५ दिवसांत देण्याचे आश्वासन

SCROLL FOR NEXT