नाशिक

पतसंस्था सर्वसाधारण सभा

CD
(पान ४ ला ॲंकर) --------- KSE26B01833 साक्री : साक्री तालुका माध्यमिक सेवक पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना अध्यक्ष दीपक सोनवणे. ---------- साक्री माध्यमिक सेवक पतसंस्थेला ३६ लाखांचा नफा दीपक सोनवणे : सभासदांना साडेसात टक्के लाभांश; लवकरच स्वतःची इमारत उभारणार सकाळ वृत्तसेवा कासारे, ता. २१ : साक्री तालुका माध्यमिक सेवकांची पतसंस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम असून, यंदा संस्थेला ३६ लाख रुपयांचा नफा झाला आहे. सभासदांना आर्थिक आधार देत संस्थेची ३२ वर्षांची यशस्वी वाटचाल सुरू असून, लवकरच पतसंस्थेची स्वतःची इमारत उभी राहावी, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे संस्थेचे अध्यक्ष दीपक सोनवणे यांनी सांगितले. साक्री तालुका माध्यमिक सेवकांची पतसंस्था मर्यादित, साक्रीची वार्षिक सर्वसाधारण सभा कासारे येथील पांडव लॉन्स येथे झाली. या वेळी महाराष्ट्र फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष विजय मंगळे, ॲड. अण्णासाहेब पाटील, पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष जे. एम. वाघ, अध्यक्ष दीपक सोनवणे, उपाध्यक्ष प्रकाश शेवाळे, ज्योत्स्ना वाघ, ग. स. बँकेचे नवनिर्वाचित संचालक गौरव सोनवणे, वैभव सोनवणे आदी उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात दीपक सोनवणे यांनी संस्थेच्या वार्षिक कामकाजाचा आढावा घेतला. ते म्हणाले, पतसंस्था गेल्या ३२ वर्षांपासून सभासदांना विविध कर्जांच्या माध्यमातून आर्थिक आधार देत आहे. अनेक सेवकांच्या कुटुंबांच्या उभारणीत संस्थेचा हातभार लागला आहे. संस्थेची वाटचाल सुस्थितीत असून, भविष्यात स्वतःची इमारत उभारण्याचा प्रयत्न आहे. संचालक डी. व्ही. सूर्यवंशी यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. सभासदांना विविध कर्जांच्या माध्यमातून आर्थिक उभारी देण्याचे काम संस्था करीत असून, यंदा संस्थेला ३६ लाख रुपयांचा नफा झाला आहे. सभासदांच्या शेअर्सवर साडेसात टक्के लाभांश देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सभेत मागील सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त, चालू आर्थिक वर्षाचा अहवाल, मार्चअखेरचे ताळेबंदपत्रक, नफा-तोटा पत्रक यांचे वाचन करण्यात आले. झालेल्या खर्चास मंजुरी, नफा वाटणी, तसेच चालू आर्थिक वर्षाच्या खर्चाच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. याशिवाय विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. गुणवंतांचा सत्कार सभेच्या निमित्ताने पतसंस्थेचे सभासद असलेल्या निवृत्त मुख्याध्यापक, शिक्षक तसेच पदोन्नती मिळालेल्या मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला. सभासदांच्या पाल्यांनी विविध परीक्षांमध्ये प्रावीण्य मिळवल्याबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला. सभासद व्ही. एम. देवरे यांच्या मुलाची एम.डी. मेडिसिन अभ्यासक्रमासाठी निवड झाल्याबद्दल देवरे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच दातर्ती विद्यालयाचे शिक्षक रवींद्र खैरनार यांचा मुलगा स्पर्श रविंद्र खैरनार याची राष्ट्रीय स्तरावरील एसजीसीएल क्रिकेट लीगमध्ये उदयपूर संघाकडून ७५ हजार रुपयांच्या मानधनासह निवड झाल्याबद्दल गौरव करण्यात आला. उपस्थित सभासदांना उपस्थिती भत्ताही देण्यात आला. महाराष्ट्र फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष विजय मंगळे यांनी पतसंस्थेच्या पारदर्शक कामकाजाबद्दल गौरवोद्गार काढले. मात्र, सर्वसाधारण सभेला सभासदांची उपस्थिती अपेक्षेपेक्षा कमी असल्याबद्दल पदाधिकाऱ्यांनी खंत व्यक्त केली. या वेळी संचालक अनिल शिंदे, डी. व्ही. सूर्यवंशी, सुनील क्षिरसागर, सुनील भदाणे, कुणाल मराठे, बाळकृष्ण तोरवणे, पौर्णिमा बेडसे, वंदना सोनवणे, गायत्री पाटील, बी. एन. पाटील, स्वीकृत संचालक राजेंद्र गांगुर्डे, के. के. नांद्रे आदी उपस्थित होते. पतसंस्थेच्या कामकाजासाठी कर्मचारी भानुदास बागुल, के. एम. जाधव, हेमंत महाले, धीरज नांद्रे, कैलास अहिरराव, सुभाष सोनवणे व राकेश सोनवणे यांनी सहकार्य केले. विशेष सहकार्याबद्दल वैभव वाघ यांचा सत्कार करण्यात आला. बाळकृष्ण तोरवणे यांनी सूत्रसंचालन केले. तर उपाध्यक्ष प्रकाश शेवाळे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

Junnar News : शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

लहानपणीचं गाणं आजही तोंडपाठ आहे, पण कालचा अभ्यास लक्षात राहत नाही; असं का? जाणून घ्या मेंदूचं रहस्य

Marathi News Live Updates: गौतमी पाटीलने घेतलं दगडूशेठ गणपतीचं दर्शन

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

SCROLL FOR NEXT