सिद्धार्थवाडीत गांजा विक्री
करणारा संशयित जेरबंद
मालेगाव : शहरातील सिद्धार्थवाडी परिसरात अवैधरीत्या गांजाची विक्री करणाऱ्या संशयिताला किल्ला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून १४ हजार २५० रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. हवालदार निसार सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बुधवारी (दि.१३) रात्री सिद्धार्थवाडी परिसरातील कोसर मशिदीजवळ छापा टाकण्यात आला. कारवाईत संशयित शेख याकूब शेख रशीद (वय २२) याला ताब्यात घेण्यात आले. पाेलिसांच्या झडतीदरम्यान संशयित शेख याकुबच्या घरातून १४ हजार २५० रुपये किंमतीचा १ किलो ९०० ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी किल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.