नाशिक

घात - अपघात

CD
अपघातात चालकाचा झोडगे भागात मृत्यू मालेगाव : मुंबई - आग्रा महार्गावरील झोडगे शिवारात सीएनजी पेट्रोलपंपाजवळ मालट्रक (एमएच १८ बीएच ४०१६) ही बंद अवस्थेत उभी होती. रात्रीच्या वेळेस मालट्रक चालक राजू दयाराम साहू (रा. सेंधवा, मध्यप्रदेश) याने कोणतेही इंडीकेटर न लावता ट्रक रस्त्याच्या मधोमध उभी केली. पाठीमागून आलेल्या टाटा कंपनीचा ट्रकने (एचआर ६१ ई ४६९३) बंद ट्रकला धडक दिली. यात चालक इस्माईल खान नबी अहमद (वय ३२, रा. हातीन, जि. मेवात) हा गंभीर जखमी होवून त्याचा मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेल्या बॉबी रामबाबू मौर्या हा जखमी झाला. राहुल शर्मा यांच्या तक्रारीवरुन मालट्रक चालक राजू साहू याच्याविरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सटाणा नाक्याहून दुचाकी चोरीला मालेगाव : येथील सटाणा नाका भागातील अमय लॉन्सच्या गेटमधून संजय काशिराम भदाणे (रा. मालेगाव) यांची दुचाकी (एमएच ४१ के ९४२८) चोरट्यांनी चोरुन नेली. कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ---- २० हजाराची दुचाकी लंपास मालेगाव : येथील टिळक नगर भागातील गल्ली नं. २ मधील गोकुळ शामराव खैरे (वय ५५) यांची २० हजाराची हिरो स्प्लेंडर दुचाकी (एमएच २० एएम ७८८८) चोरट्यांनी चोरुन नेली. छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज, १० जिल्ह्यांना अलर्ट; विजांसह वादळी पावसाचा इशारा

UP Career Guidance: IAS-IPS अधिकारी आता थेट शाळेत; १२ वीच्या विद्यार्थ्यांना करिअरचे धडे देणार योगी सरकार

India Justice Access Reforms: न्यायालयापर्यंत पोहोचणे सोपे करा; CJI सूर्यकांत यांचा विधी सेवा यंत्रणेला संदेश, मुख्यमंत्र्यांना आठवल्या अहिल्यादेवी

Sangli Crime : सोनी-पाटगावमध्ये सराईत गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने खून; मिरज तालुका हादरला, सांगली जिल्ह्यात भीतीचे वातावरण

आजचे राशिभविष्य - 09 ऑगस्ट 2026

SCROLL FOR NEXT