नाशिक

रक्तदानातून मानवतेचा विजय''

CD
अँकर -- फोटो -15347 मालेगाव : शंभर वेळा रक्तदान करणारे दीपक शेलार यांचा सत्कार करतांना शिक्षण मंत्री दादा भुसे, समवेत संजय फतनानी आदी. ---- रोटरी क्लब ठरला माणुसकीचा दीपस्तंभ मंत्री भुसे ः क्लबचा वर्षभरात शंभरावा यशस्वी उपक्रम सकाळ वृत्तसेवा मालेगाव, ता. २६ : माणूस संपत्तीने मोठा होत नाही, तर तो आपल्या सेवाभावाने आणि रक्ताच्या प्रत्येक थेंबातून वाचलेल्या जीवांच्या आशीर्वादाने मोठा होतो. रोटरी क्लब ऑफ मालेगाव व्हिजनचा हा १०० वा प्रोजेक्ट केवळ एक उपक्रम नसून, समाजाला माणुसकी आणि रक्तदानाचे अमूल्य महत्त्व शिकवणारा प्रेरणेचा दीपस्तंभ ठरला आहे, असे प्रतिपादन राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केले. -- जगभर सामाजिक सेवा, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या रोटरी इंटरनॅशनलच्या सेवाभावी परंपरेला साजेसा मानाचा तुरा रोटरी क्लब ऑफ मालेगाव व्हिजनने रोवला आहे. क्लबने चालू वर्षातील शंभरावा समाजोपयोगी रक्तदानाचा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केला. या विशेष उपक्रमात १०० रक्ताच्या बाटल्यांचे संकलन करून अनेक गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचा संकल्प प्रत्यक्षात उतरविण्यात आला. याप्रसंगी क्लबचे चार्टर्ड प्रेसिडेंट दीपक शेलार यांनी स्वतःचे शंभरावे रक्तदान पूर्ण करत समाजासमोर सेवाभावाचा एक अनोखा आदर्श निर्माण केला. त्यांच्या समवेत वैशाली शेलार यांनीही रक्तदान केले. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार म्हणून व्यासपीठावर मंत्री दादा भुसे, संजय फतनानी, सचिव वैभव सोनवणे, विजय डोखे, ॲड. रमेश मोरे, शेखर सोनवणे, प्रशांत सोनवणे, मिलिंद सोनवणे, विनोद शेलार, प्रसाद पेठकर, जयराम माळी, सागर रौंदळ, प्रवीण निकम, डॉ. शरद शिरोळे, डॉ. ऋषिकेश पाटील व राजाराम पवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमात डॉ. दिलीप भावसार व मालेगाव ब्लड बँकेच्या टीमचा विशेष सत्कार करण्यात आला. या उपक्रमासाठी डिस्ट्रिक्ट ३०३० चे गव्हर्नर ज्ञानेश्‍वर शेवाळे व असिस्टंट गव्हर्नर अरुण पवार यांचे मार्गदर्शन लाभले. उपक्रम यशस्वीतेसाठी मधू माऊली, प्रकल्प अध्यक्ष संजय फतनानी, प्रशांत सोनवणे, योगेश जाधव, शेखर सोनवणे आदींसह रोटरीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT