फोटो -15860
मालेगाव : विद्यार्थ्यांचा सत्कार करताना प्राचार्या प्रा. डॉ. मृणाल भारद्वाज व शिक्षक.
------
सिटी महाविद्यालयात
घोषणाबाजी स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता. ११ : येथील सिटी महाविद्यालयात मानसशास्त्र आणि इंग्रजी विभागातर्फे ‘जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन’ झाला. यानिमित्त आशेची सुरुवात संवादातून होते, या संकल्पनेवर आधारित विशेष जनजागृती कार्यक्रम व घोषणाबाजी स्पर्धा झाली.
विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्य, आशावाद, सहानुभूती, भावनिक आधार आणि एकमेकांमधील अर्थपूर्ण संवादाचे महत्त्व रुजवून आत्महत्येसारख्या गंभीर समस्येबद्दल जागृती निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. प्राचार्या प्रा. डॉ. मृणाल भारद्वाज यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मानसशास्त्राचे व्यापक महत्त्व आणि त्याच्या विविध शाखांची माहिती देत त्यांनी या विषयावरील आपली आवड व्यक्त केली. तसेच महाविद्यालयात ‘बी. एस्सी. सायकॉलॉजी’ हा नवीन अभ्यासक्रम सुरू करणार असल्याचे सांगितले. ‘नकारात्मक विचारसरणी आणि सततचा भावनिक ताणतणाव’ व्यक्तीच्या मानसिक स्वास्थ्यावर वाईट परिणाम करतो. विद्यार्थ्यांनी नेहमी सकारात्मक आणि स्थिर मानसिकता ठेवावी, अडचणीच्या काळात मदत मागावी, आपल्या भावना इतरांजवळ व्यक्त कराव्यात. मानसिक आरोग्याकडेही गांभीर्याने पाहणे गरजेचे असल्याचा संदेश त्यांनी दिला. कार्यक्रम यशस्वितेसाठी उपप्राचार्य डॉ. आरिफ अंजुम, डॉ. शकीब अहमद, प्रा. जर्रीन, प्रा. सारा खान आदींनी प्रयत्न केले. स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.