नाशिक

टिपू सुलतान प्रकरणी किल्ला पाेलिस व महापालिकेकडून जवाब

CD
फोटो -15912 मालेगाव : संविधानातील भाग १६ मधील टिपू सुलतान यांचे तैलचित्र दाखविताना उपमहापौर शानेहिंद. ---- टिपू सुलतान तैलचित्र प्रकरणात उच्च न्यायालयाने मागविले उत्तर सकाळ वृत्तसेवा मालेगाव, ता. १७ : महापालिकेत उपमहापौर शानेहिंद यांच्या दालनात टिपू सुलतान यांचे तैलचित्र लावल्यामुळे सुरुवातीला राज्यभर वादंग उठले हाेते. उपमहापौर यांच्या दालनाचे काम सुरू असल्याने त्यांनी तैलचित्र काढले होते. पुन्हा उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतान यांचे तैलचित्र लावल्याने शिवसेना, विश्‍व हिंदू परिषद तसेच हिंदुत्ववादी संघटनांतर्फे याचा निषेध करून आंदोलन करण्यात आले. या प्रकरणी नगरसचिव व किल्ला पोलिसांनी उपमहापौरांना तैलचित्र काढण्यासंदर्भात नोटीस बजावली. त्या नोटिशीला आव्हान देण्यासाठी उपमहापौर शानेहिंद यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याचिकेवर बुधवारी (ता. १६) पहिली सुनावणी झाली. या प्रकरणी न्यायालयाने महापालिका व किल्ला पोलिसांकडून म्हणणे मागितले आहे. आठवड्यात म्हणणे दाखल करावे, असे आदेश काढले असल्याचे उपमहापौर शानेहिंद यांनी येथे सांगितले. समाजवादीचे गटनेते मुश्‍तकीम डिग्निटी यांच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या वेळी शानेहिंद म्हणाल्या, की न्यायालयाने हा विषय महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे. पोलिस व महापालिकेचे म्हणणे दाखल झाल्यानंतर मलादेखील माझी बाजू मांडण्याची सूचना केली आहे. महात्मा गांधी व टिपू सुलतान यांच्यासह राष्ट्रपुरुषांबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी यासाठी स्वतंत्र कायदा करावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिताना विचारविनिमय करून लिहिले आहे. यात टिपू सुलतान यांचे तैलचित्र बनवले आहे. २८ सप्टेंबरला उपमहापाैर कार्यालय उघडणार असल्याचे त्यांनी सांगितले. उपमहापौर शानेहिंद यांनी संविधानाची प्रत हातात घेत त्यामधील टिपू सुलतान यांचे तैलचित्र दाखविले. उच्च न्यायालयात शानेहिंद यांच्यातर्फे ॲड. एम. पी. वसीम यांनी बाजू मांडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजांचा कडकडाट अन् वादळी वाऱ्याचा तडाखा! कोकण, विदर्भ, मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांत मुसळधारेचा इशारा

IND vs AFG 3rd T2OI: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच... श्रेयस अय्यरने Playing XI मध्ये केलाय एक बदल; जाणून घ्या संघ

72-Year-Old Paragliding : आजोबांनी Gen-Z लाही लाजवलं ! वयाच्या ७२व्या वर्षी घेतली आकाशात झेप, २४ हजार फूट उंचीवरून पॅराग्लायडिंग, VIDEO VIRAL

Latest Marathi News Update : नागपूरच्या अजनी चौकात ‘आशीर्वाद का दीया’ अभियान; दीपोत्सवाला मुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती

Lightning Strike Tragedy: सिल्लोडच्या दहिगावात शेतातील झोपडीवर वीज कोसळून पती-पत्नीचा मृत्यू, मुलगा गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT