नाशिक

मनमाडमध्ये पहाटेचे दुहेरी हत्याकांड

CD
मनमाडमध्ये पहाटे दुहेरी हत्याकांड --- महामार्गालगत झोपलेल्या दोघांना दगडाने ठेचले; संशयित ताब्यात सकाळ वृत्तसेवा मनमाड, ता. २२ : शहरातून जाणाऱ्या इंदूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी (ता. २२) पहाटे एका माथेफिरूने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या दोन बेघर व्यक्तींची मोठ्या दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या दुहेरी हत्याकांडामुळे मनमाड शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले. प्राथमिक माहितीनुसार तो मनोरुग्ण असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज नंदू बोमराज (रा. बागमार, ता. पांडा, जि. खंडवा, मध्य प्रदेश) याने महामार्गालगत वेगवेगळ्या ठिकाणी झोपलेल्या दोन व्यक्तींवर मोठे दगड टाकून त्यांची हत्या केली. मृतांपैकी बाळू प्रल्हाद अमृतसागर (वय ३५, रा. खेड, जि. धुळे) यांची ओळख पटली असून, दुसऱ्या मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. दोघांचेही वय ३५ ते ४० वर्षांच्या दरम्यान असल्याचे पोलिसांनी सांगितले. पहिली घटना अलंकार चित्रपटगृह परिसरातील एचपी पेट्रोलपंपासमोरील सपना वडापाव दुकानाजवळ घडली. येथे झोपलेल्या एका अनोळखी व्यक्तीच्या डोक्यात मोठा दगड घालून त्याला गंभीर जखमी करण्यात आले. उपचारांसाठी त्याला प्रथम मनमाड येथील रुग्णालयात, त्यानंतर मालेगाव येथे हलविण्यात आले; मात्र उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. दुसरी घटना भारत पेट्रोलपंपाजवळील एसटी बसस्थानकाच्या कंपाउंडलगत घडली. येथे झोपलेल्या बाळू अमृतसागर यांच्या डोक्यावर मोठा दगड टाकून त्यांची जागीच हत्या करण्यात आली. दरम्यान, रात्री गस्त घालत असलेल्या पोलिसांना नागरिकांकडून घटनेची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहोचून तपास सुरू असताना रेल्वे उड्डाणपुलाखालून रेल्वेस्थानकाच्या दिशेने घाईघाईने जात असलेला एक संशयित व्यक्ती आढळून आला. त्याला पकडण्याचा प्रयत्न करताना त्याने पोलिसांवर दगड फेकण्याचाही प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव मनोज बोमराज असल्याचे सांगितले. त्याला वैद्यकीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे. दोन्ही हत्या एकाच व्यक्तीने केल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट होत आहे. संशयिताची मानसिक स्थिती तपासण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. वैद्यकीय अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक विजय करे यांनी दिली. चौकट बारा तासांत आरोपी जेरबंद - पहाटे दोन ठिकाणी हल्ले - दोघांच्या डोक्यात दगड घालून हत्या - नागरिकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांना माहिती - रेल्वेस्थानकाकडे जाताना संशयित ताब्यात - पोलिसांवरही दगडफेकीचा प्रयत्न - मानसिक आरोग्य तपासणीसाठी वैद्यकीय चाचणी MNM26B09432, MNM26B09433 मनमाड : घटनास्थळी दाखल पोलिस.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Qatar LNG Plant Explosion : कतारच्या एलएनजी प्लँटमध्ये भीषण स्फोट; १२ भारतीयांचा होरपळून मृत्यू, भारतीय दुतावासाकडून चिंता व्यक्त

Pakistan Water Shortage: पाकच्या हैदराबादमध्ये भीषण पाणीटंचाई; उद्योग क्षेत्र संकटात, उत्पादनावर परिणाम; जनजीवन विस्कळित

पवनराजे हत्याकांडाचा निकाल विरोधात लागताच फोन, ओमराजेंना काय सांगितलं? एकनाथ शिंदेंनी केला खुलासा

Nagpur: ४२ वर्षीय डॉक्टरनं भुलीचं इंजेक्शन टोचून घेत आयुष्य संपवलं, ५ दिवसांपासून गेले नव्हते घरी

Latest Marathi News Live Update : उत्तर महाराष्ट्रातील शालार्थ आयडी घोटाळा, SIT च्या तपासात धक्कादायक बाब समोर

SCROLL FOR NEXT