नाशिक

Datta Jadhav

CD
फोटो : B02932 ----------------- गुणवंत विद्यार्थ्यांमुळे ‘नाएसो’चा नावलौकिक : प्रा. दिलीप फडके सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १४ : नाशिक एज्युकेशन सोसायटी शिक्षण क्षेत्रात गत १०४ वर्षापासून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत असून गौरवशाली इतिहास व उज्ज्वल परंपरा लाभलेली संस्था आहे. संस्थेत शिक्षण घेतलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांमुळे संस्थेला नावलौकिक प्राप्त होतो, असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांनी रंगूबाई जुन्नरे हायस्कूल येथे शालांत परीक्षा २०२६ च्या गुणवंत विद्यार्थी गुणगौरवाप्रसंगी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना प्रा. फडके यांनी ज्या घरट्याने, शाळेने तुम्हाला या यशापर्यंत पोहोचवले आहे, त्या शाळेला कायम लक्षात ठेवा, अशी अपेक्षा व्यक्त केली. संस्थेच्या सर्वच शाळांचे निकाल सर्वोत्तम लागले असून, दुर्गम भागात सुरू असलेल्या आश्रम शाळा वेळुंजे येथील निकाल सतत पंधरा वर्षांपासून शंभर टक्के लागत असल्याचे सांगून सर्वच शाळांचे अभिनंदन व कौतुक केले. व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर मोंढे, ॲड. जयदीप वैशंपायन, कार्यवाह राजेंद्र निकम, कार्यकारी मंडळ सदस्य सरोजिनी तारापूरकर, रंजना परदेशी, मैथिली गोखले, सचिन महाजन, शि. म. उपाध्यक्ष राजेंद्र कापसे, सहकार्यवाह शैलेश पाटोळे, उमेश कुलकर्णी, पंढरीनाथ बिरारी आदी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांनी दीप प्रज्वलन केले. स्वागत व प्रास्ताविक कार्यवाह राजेंद्र निकम यांनी केले. संस्थेच्या सर्वच शाळांमधून प्रथम आलेली विद्यार्थिनी श्रावणी नांदुर्डीकर हिने शंभर गुण मिळवून महाराष्ट्रात नावलौकिक मिळवला. या विद्यार्थिनीशी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी संवाद साधून अभिनंदन व कौतुक केले. याप्रसंगी संस्थेच्या सर्व शाळांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सहकार्य वाह शैलेश पाटोळे यांनी तर आभार उपाध्यक्ष चंद्रशेखर मोंढे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : व्हीआयपी दौऱ्यातील ताफा आता निम्म्यावर; पुणे पोलिसांचा निर्णय

Pune Garbage Management : बालेवाडीत कचरा संकलनासाठी पीएमपी बस डेपोची ३ हजार चौ.फु. जागा; स्थायी समितीची मंजुरी

Vaibhav Sooryavanshi ला टीम इंडियात संधी मिळाली, LSG च्या संजीव गोएंका यांची पोस्ट व्हायरल! म्हणतात, देश आश्चर्याने पाहत आहे...

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात; पण रक्कम पाहून महिलांना बसला धक्का!

Pune DPC Meet: प्रशासकीय खर्च कपातीसाठी पुण्यात जिल्हा नियोजन समितीची बैठक ऑनलाइन; मोदींच्या आवाहनानुसार तातडीने अंमलबजावणी

SCROLL FOR NEXT