नाशिक

शनैश्‍वर महाराज जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रम

CD
नाशिकमध्ये आज शनैश्‍वर जयंती उत्सव विविध शनीमंदिरांत अभिषेक, पालखी सोहळे, यज्ञ व महाप्रसादाचे आयोजन सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.१५ : मानवी जीवनातील कर्मानुसार फळ देणारी न्यायदेवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री शनैश्‍वर अर्थात शनीदेवाची जयंती शनिवारी (ता.१६) साजरी होत आहे. यानिमित्त शहरातील विविध शनैश्‍वर मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंचवटीतील शनी चौकातील शनीमंदिरात आकर्षक फुलांची आरास करण्यात आली आहे. ट्रस्टतर्फे आज नवग्रह मख व शनैश्‍वर याग संपन्न झाला. वेदमूर्ती प्रवीण जोशी व वेदमूर्ती गायधनी यांनी पौरोहित्य केले. उद्या सकाळी सहा वाजता शनैश्‍वर महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त लघुरुद्राभिषेक होणार आहे. सायंकाळी सहा वाजता सवाद्य पालखी सोहळा काढण्यात येणार असून, रविवारी (ता. १७) महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार मुठे, उपाध्यक्ष सुनील महंकाळे, सचिव मंदार जानोरकर, तसेच विश्वस्त केदार जानोरकर व अतुल कोठुळे यांनी केले आहे. भद्रकाली येथील साक्षी गणेश शनीमंदिर, रविवार पेठ, पेठ रोड तसेच जुना आडगाव नाका परिसरातील शनीमंदिरांमध्येही विविध धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. चांदशीतील पापा शनीदेव मंदिरात विशेष कार्यक्रम वैशाख अमावस्या व शनैश्‍वर जयंतीनिमित्त चांदशी येथील पापा शनीदेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी आठ वाजता ध्वजारोहणाने कार्यक्रमास सुरुवात होईल. त्यानंतर सकाळी नऊ ते साडेबारा या वेळेत शनीमहात्म्य पठण, भजन-कीर्तन व महाआरती होणार आहे. दुपारी दोन ते सायंकाळी साडेसहा दरम्यान महारुद्राभिषेक व शनीयाग आयोजित करण्यात आला आहे. सूर्यास्तावेळी शनीदेवांचा जन्मोत्सव साजरा करण्यात येईल. सायंकाळी साडेसात वाजता महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. कार्यक्रमास आमदार सीमाताई हिरे, आयपीएस आदित्य मिरखेलकर, उद्योगपती अनिल बूब आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : मुंबईत दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरुच, रायगड, पालघरमध्ये शाळांना सुट्टी; रेड अलर्ट जारी, पुढील ४ दिवस धोक्याचे

पोलिस उपायुक्तांचे आदेश! ट्रॅफिक पोलिस नेमलेल्या ठिकाणीच असणे बंधनकारक; ‘HSRP’ नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर ‘आरटीओ’ करणार कारवाई; रिक्षा चालकांना ड्रेसकोडचे बंधन

चोरीचे दागिने घेणारा सराफही आरोपी! पावतीशिवाय दागिने घेतल्यास पोलिसांकडून कारवाई; ‘या’ कलमाखाली 3 वर्षांपर्यंत कारावास अन्‌ दंडाची शिक्षा, वाचा...

जिल्हा परिषदेच्या भन्नाट योजना! महिलांना शिलाई मशीन, पिठाची गिरणी; सातवी ते बारावीतील मुलींना सायकली, टॅली, MS-CIT, कराटे प्रशिक्षण, गरीब मुलांना पैसेही

Best Banana French Toast: बिझी मॉर्निंगसाठी बेस्ट! 10 मिनिटांत बनवा बनाना फ्रेंच टोस्ट; लिहून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT