नाशिक

संभाजी महाराजांना अभिवादन

CD
धुळे ः टुडे २ साठी --- फोटो- NSK26H19254 धुळे : शंभूतीर्थ येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन अभिवादनप्रसंगी उपस्थित आमदार अनुप अग्रवाल व इतर मान्यवर. --- शंभूतीर्थावर छत्रपती संभाजीराजांना अभिवादन --- धुळ्यात जयंतीनिमित्त रक्तदान, सत्कार, सामाजिक उपक्रम सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १४ : छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त छत्रपती संभाजी राजे पूर्णाकृती पुतळा निर्माण समिती आणि छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीतर्फे गुरुवारी (ता.१४) देवपूरातील शंभूतीर्थ (छत्रपती संभाजी महाराज उद्यान) येथे अभिवादनासह विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिषेक व माल्यार्पण झाले. आमदार अनुप अग्रवाल यांच्याहस्ते अभिषेक सोहळा झाला. महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, मनपा स्थायी समिती सभापती लता पोतदार (सोनार), माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी महापौर भगवान करनकाळ, चंद्रकांत सोनार, महामंडलेश्वर पार्वती जोगी, डॉ. सुशील महाजन, डॉ. निशा महाजन, किरण कुलेवार, महादेव परदेशी, राजेश पवार, रणजीत भोसले, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे, कार्याध्यक्ष अतुल पाटील, प्रभा परदेशी, प्रफुल्ल पाटील, कैलास मराठे, अशोक सुडके, शुभांगी पाटील, हेमा हेमाडे, जसपाल सिसोदीया, निंबा मराठे, संजय वाल्हे, समाधान शेलार, तुषार नवले उपस्थित होते. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा या वेळी सत्कार झाला. छत्रपती संभाजी राजे पूर्णाकृती पुतळा उभारणीसाठी योगदान देणाऱ्यांचाही गौरव करण्यात आला. नागरिकांनी रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘छावा’ फलकाचे उद्‌घाटन झाले. समितीचे प्रवर्तक नानासाहेब कदम, अर्जुन पाटील, ॲड. नितीन पाटील, मनोज पवार, दिलीप पाटील, विनोद जगताप यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले. ---

IPL 2026 Playoff Scenario : पंजाब किंग्सचा सलग पाचवा पराभव! मुंबई इंडियन्सने सर्व गणित बिघडवले; CSK, RR यांना दिली आयती संधी

Gold Import: सोने आयात करणाऱ्यांसाठी मोठा धक्का! ड्युटी-फ्री गोल्डसाठी नवे कडक नियम लागू; प्रति परवान्यावर मर्यादा निश्चित

Anand Paranjape : माझ्यात शिवसेनेचाच डीएनए; माजी खासदार आनंद परांजपे स्वगृही

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

SCROLL FOR NEXT