नाशिक

महिला व बालकल्याण समितीकडून विशाखा समितीची विचारणा

CD
फोटो: १९२६२ महिला व बालकल्याण समितीकडून विशाखा समितीची विचारणा दिंडोरीतील आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत, अंगणवाडी, सह्याद्री फार्मला भेट सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १४ : नाशिक जिल्हा दौऱ्यावर असलेल्या महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीने गुरुवारी (ता.१४) दिंडोरी तालुक्याला भेट दिली. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत, पंचायत समिती, अंगणवाडीचा आढावा घेतला आणि विशाखा समितीच्या स्थापनेसह समितीचे कामकाज जाणून घेतले. आमदार मोनिका राजळे यांच्या अध्यक्षतेखालील महिला व बालकल्याण समिती तीन दिवस नाशिक दौऱ्यावर आहे. समितीच्या सदस्य आमदार डॉ. मनीषा कायंदे, आमदार सीमा हिरे, आमदार मंजुळा गावित, आमदार महेश सावंत, आमदार हिरामण खोसकर, समितीचे उपसचिव विजय कोटमवार, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील आदी उपस्थित होते. समितीने पेठ रोडवरील आदिवासी वसतिगृहाला भेट देत तेथील निवास व्यवस्था जाणून घेतली. तळेगाव येथील आरोग्य केंद्राला भेट देवून वनारवाडी येथील आदर्श अंगणवाडीत विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. यात अन्न प्राशान, गर्भवती महिलेचा कौतुक सोहळा आणि तीन वर्षांच्या बालकाचा अंगणवाडीत प्रवेश सोहळा साजरा करण्यात आला. दिंडोरी पंचायत समितीमध्ये विशाखा समितीचे कामकाज जाणून घेत या समितीने त्याबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केली. याशिवाय शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण विभागाचे कामकाज, घरकूल योजनेची स्थिती, पोलिस ठाण्यात विशाखा समितीच्या कामाचा आढावा घेतला. समितीचे बोर्ड दर्शनीय भागात आहे का? समिती सदस्य सक्रिय आहेत का? या प्रश्‍नांतून त्यांनी माहिती जाणून घेतली. सह्याद्री फार्म येथील कौशल्य विकास केंद्राला भेट देवून पुढे आदर्श ग्रामपंचायत अवनखेड येथे समितीच्या दौऱ्याच्या दुसरा दिवस पूर्ण करण्यात आला. आज समारोप समितीचा तीन दिवसीय दौरा शुक्रवारी (ता.१५) समाप्त होणार आहे. सकाळी जिल्हा शासकीय रुग्णालय, पोलिस आयुक्तालयास भेटीनंतर जिल्हा परिषदेत आढावा बैठक घेण्यात येईल. त्यानंतर समितीचा दौरा पूर्ण झाल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात येईल. सदस्य सुनील शिंदे हे अखेरच्या दिवशी दौऱ्यात सहभागी होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray Letter : बाळासाहेब, पवार साहेब, महाजन यांनी कोणालाच पाठीशी घातल नाही; राज ठाकरेंची फडणवीसांवर 'सत्तेचा माज, मौनावर' कठोर शब्दांत टीका

IND vs ENG 2nd T20I: तो परतला, आता काय खरं नाय... इंग्लंडच्या Playing XI मध्ये २ बदल; भारताला टक्कर देण्यासाठी तगडा संघ जाहीर

Latest Marathi Live Update: आमचे ऑपरेशन 3.0 सुरू... आता महाभुकंप होणार ; संजय शिरसाटांचा मोठा दावा

Sugar Factory : साखरेतील सहकाराचा गोडवा ओसरला; १६ पैकी चार कारखाने बंद, दोन भाडेपट्ट्यावर

राम मंदिर दानचोरी : आता जमिनीवर बसून मोजणी होणार, कर्मचाऱ्यांसाठी नवा ड्रेस कोड; ट्रस्टचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT