नाशिक

‘मानवता’मध्ये ''टेलि रोबोटिक्स''चे उद्‌घाटन

CD
‘मानवता’मध्ये ''टेलि रोबोटिक्स''चे उद्‌घाटन ------------ कर्करोगावर मात केलेल्या शर्वरीच्या हस्ते लोकार्पण सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.१४ : येथील एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटर हॉस्‍पिटलमध्ये गुरुवारी (ता.१४) ''दुसऱ्या सर्जिकल रोबोट''चे लोकार्पण झाले. विशेष म्हणजे, कर्करोगावर यशस्वीरीत्या मात केलेल्‍या व दहावीत ८० टक्‍के गुणांसह उत्तीर्ण झालेल्‍या शर्वरी खैरनार या विद्यार्थिनीच्‍या हस्‍ते टेलि रोबोटचे लोकार्पण करण्यात आले. मुंबई नाका भागातील मानवता हेल्‍थ कॅम्‍पस येथे झालेल्‍या कार्यक्रमास हॉस्‍पिटलचे व्‍यवस्‍थापकीय संचालक डॉ. राज नगरकर, सौ. नगरकर, प्रमोद शिंदे, डॉ. विजय पालवे, डॉ. आदित्‍य आढाव, डॉ. मोहसिना हुसेन, डॉ. कौस्तुभ कुमार, डॉ. मयूर पेखले, डॉ. गौरव रॉय, डॉ. तुषार संकलेचा व डॉ. प्रणिता संघवी आदी उपस्‍थित होते. या प्रसंगी डॉ.राज नगरकर म्‍हणाले, रुग्‍णांना नेहमीच अत्‍याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित व जागतिक स्‍तरावरील अद्ययावत उपचार उपलब्‍ध करून देण्याचा हॉस्‍पिटलचा ध्यास राहिला आहे. यापूर्वी उपलब्‍ध असलेल्‍या रोबोटिक असिस्‍टेड सर्जरीमध्ये जागतिक विक्रम नोंदविला होता. आता टेलिरोबोटच्‍या माध्यमातून शस्‍त्रक्रियेची सेवा उपलब्‍ध होणार आहे. इन्फो... शर्वरीच्‍या हस्‍ते अनावरण टेली रोबोटिक्‍सचे अनावरण शर्वरी खैरनार हिच्‍या हस्‍ते करण्यात आले. शर्वरी हिला कर्करोगाचे निदान झाले होते. तिच्‍या फुप्फुसाची व पायाची शस्‍त्रक्रिया करावी लागली होती. एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटर येथे तिने यशस्‍वी उपचार घेतले. जिद्द व चिकाटीच्‍या जोरावर तिने दहावीत ८० टक्‍के गुण मिळविले. तिच्‍या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी सर्जिकल रोबोटचे अनावरण करण्याचा बहुमान तिला देण्यात आला. इन्फो... डॉ. वसंतराव नगरकर यांच्‍या शिल्पाचे अनावरण मानवता हेल्थ कॅम्पसमधील झालेल्‍या रुद्र हॉलमध्ये सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात कै. डॉ. वसंतराव नगरकर यांच्या जन्मदिनी ''बँकिंग आज आणि उद्या: सिद्धांत आणि व्यवहार'' या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. उदय निरगुडकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्‍यांनी ''सहकार काल, आज आणि उद्या'' या विषयावर उपस्‍थितांशी संवाद साधला. या वेळी डॉ. वसंतराव नगरकर यांच्या शिल्पाचे अनावरण मान्‍यवरांनी केले. या कार्यक्रमास खासदार राजाभाऊ वाजे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी मनोहर त्रिभुवन, विश्वास ठाकूर, अजय ब्रम्हेचा, सोहनलाल भंडारी, राजेंद्र सूर्यवंशी, विजय संकलेचा आणि अशोक तापडिया आदी उपस्‍थित होते. नगरकर कुटुंबातील विजया नगरकर, दिगंबर नगरकर, डॉ. राज नगरकर, रणजीत नगरकर, समीर नगरकर आदी उपस्‍थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : पंजाब किंग्सचा सलग पाचवा पराभव! मुंबई इंडियन्सने सर्व गणित बिघडवले; CSK, RR यांना दिली आयती संधी

Gold Import: सोने आयात करणाऱ्यांसाठी मोठा धक्का! ड्युटी-फ्री गोल्डसाठी नवे कडक नियम लागू; प्रति परवान्यावर मर्यादा निश्चित

Anand Paranjape : माझ्यात शिवसेनेचाच डीएनए; माजी खासदार आनंद परांजपे स्वगृही

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

SCROLL FOR NEXT