कफ सिरपच्या वाहनावर छापा
---
सुरत- मालेगाव कनेक्शन; नशा प्रकरणी दोन अटकेत
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २२ ः नशेसाठी सर्रास वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित कफ सिरपची बेकायदेशीर वाहतूक करणारी कार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कुसुंबा (ता. धुळे) शिवारात सापळा रचून पकडली. या कारवाईत पोलिसांनी कफ सिरपच्या ४१० बाटल्या आणि कारसह एकूण १० लाख ५१ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सुरत आणि मालेगाव येथील संशयितांवर धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
एजाज रफिक शेख (रा. सलाबादपुरा, सुरत, गुजरात) आणि अमीन शाह (रा. मालेगाव, जि. नाशिक) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. सुरत- नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून प्रतिबंधित औषधांची मोठी वाहतूक धुळ्यामार्गे होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या आधारे पोलिस निरीक्षकांच्या पथकाने कुसुंबा शिवारातील उड्डाणपुलाखाली रात्री नाकाबंदी करून सापळा रचला. संशयास्पद वाटणारी कार (जीजे १६, बीबी २६०७) अडवून तिची झडती घेतली असता, कारमध्ये दोन नामांकित कंपन्यांच्या कफ सिरपच्या ४१० बाटल्या आढळल्या.
सुरत- मालेगाव कनेक्शन
कारचालक एजाज शेख याच्याकडे या औषध साठ्याबाबत आणि वाहतुकीबाबत कोणतीही वैध कागदपत्रे किंवा परवाना मिळून आला नाही. पोलिसी खाक्या दाखविताच हा साठा सुरत येथील एका मेडिकल स्टोअरमधून खरेदी केल्याची आणि तो मालेगाव येथे पोहोचविला जाणार असल्याची कबुली संशयिताने दिली. मात्र, मालेगावात हा साठा नेमका कोणाला दिला जाणार होता, याचा तपास आता पोलिस करीत आहेत. ‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, पथकातील अंमलदारांनी ही कारवाई केली. यामुळे आंतरराज्य ड्रग्ज आणि प्रतिबंधित औषधतस्करांचे धाबे दणाणले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.